घरदेश-विदेशदिल्लीतील पबमध्ये आता फक्त लाईव्ह म्युझिकच वाजणार

दिल्लीतील पबमध्ये आता फक्त लाईव्ह म्युझिकच वाजणार

Subscribe

दिल्ली सरकारने पब आणि रेस्टॉरंटसाठी नविन आदेश काढला आहे. दिल्लीतील पब मध्ये आता रेकॉर्डेड गाण्यावर ताल धरता येणार नाही. कारण दिल्लीतील पबमध्ये आता लाईव्ह म्युझिकलाच परवानगी देण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. दिल्ली सरकारचा हा नियम पब आणि रेस्टॉरंटसाठी आहे.
दिल्लीतील उत्पादन शुल्क विभागाने रेकॉर्डेड म्युझिक पबमध्ये वाजविण्यास बंदी केली आहे. उत्पादन विभागाचे उप आयुक्त अशरफ अली यांनी सांगितले की, सध्या अस्तित्वात असलेल्या नियमांचा पुर्नविचार उत्पादन शुल्क विभाग करीत आहे.
तथापि, उत्पादन शुल्क विभागाने १६ मे रोजी परिपत्रक काढले होते. त्यानुसार, एल -१७ लायसन्स आणि परमिट सामान्य श्रेणी असलेल्या हॉटेल आणि रेस्टॉरंट्समध्ये लाईव्ह म्युझिक प्ले करू शकतात, असे या परिपत्रकाव्दारे म्हटले आहे.
उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ग्रेटर कैलाशसारख्या परिसरातील स्थानिक लोकानी आवाजाची तक्रर दाखल केली आहे. त्या तक्रारीनंतर ही नोटीस जारी करण्यात आली होती. ग्रेटर कैलाश मधील एम ब्लॉक मार्कट परिसरात अनेक पब आणि रेस्टॉरंट्स आहेत.
बऱ्याच बार मालकांनी नोटीसवर अनेक प्रश्न विचारले होते. फ्लाइंग सॉसर आणि बूमबॉस् कॅफेच्या मालक प्रियांका सुखीजा यांनी ह्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. मी या उद्योगात अनेक वर्ष असल्याने हे सर्व नियम मला हास्यास्पद वाटत आहेत.” असे देखिल त्या म्हणाल्या.
तसेच पब जंकयार्ड कॅफे आणि गरम धरमचे रेस्टॉरंटचे मालक असलेले उमंग तिवारी म्हणाले, “नियमांमुळे लोकांना त्रास होणार नाही हे खरे, या नियमांमुळे परिस्थिती सुधारेल हे देखिल तितकेच खरे, परंतु जे व्यापारी आधीपासूनच,वस्तू आणि सेवा कर यंत्रणेच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. त्यांच्यावर रेकॉर्ड म्युझिक वापरची बंदी का घालत आहात..? लाईव्ह म्युझिक वाजवून देखिल तितकाच आवाज होणार आणखी वादकांचा खर्च देखिल येणार, तर रेकॉर्ड म्युझिक वापरायला बंदी करण्यात काय अर्थ आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -