घरदेश-विदेशऐन ख्रिसमसमध्ये लाखो कर्मचाऱ्यांचं 'शटडाऊन'

ऐन ख्रिसमसमध्ये लाखो कर्मचाऱ्यांचं ‘शटडाऊन’

Subscribe

अमेरिकेतील सुमारे ८ लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर ऐन ख्रिसमसच्या काळात 'शटडाऊन'ची स्थिती ओढावल्यामुळे, ते चांगलेच नाराज आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे गेल्या काही काळापासून सीमेवर भिंत बांधण्यासाठी पैशांची मागणी करत आहेत. बेकायदा स्थलांतर रोखण्यासाठी अमेरिका-मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी 5 अब्ज डॉलर्सची मागणी ट्रम्प यांनी अमेरिकी काँग्रेसकडे केली आहे. त्यामुळे रिपब्लिकन व डेमोक्रॅट नेत्यांमध्ये पुन्हा एकदा कोंडी निर्माण झाली आहे. अमेरिकी कॉंग्रेस संस्थगित झाल्याने सरकारी खर्चाला परवानगी देणारे विधेयक मंजूर न करताच अमेरिका सरकारचे ‘शटडाऊन’ आजपासून सुरू झाले आहे. ‘शटडाऊन’ ही संकल्पना अमेरिकेच्या राजकारणारत खूप महत्वाची समजली जाते. सरकारी खर्चाला मंजुरी देणारे विधेयक संसदेत पास झाले नाही किंवा अध्यक्षांनी या प्रकारच्या खर्चाला परवानगी देणाऱ्या अध्यादेशावर सही केली नाही, तर अशावेली ‘शटडाऊन’ केले जाते. या परिस्थितीत, बऱ्याचशा सरकारी कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले जाते किंवा मग बिनपगारी काम करण्यास सांगितले जाते. सध्या अमेरिकत अशीच काहीशी परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

ट्रम्प यांनी केलेल्या पैशांच्या मागणीनुसार खर्चाला मंजुरी देण्याबाबात अमेरिकी काँग्रेसमध्ये जोरदार चर्चा सुरु होती. मात्र, रिपब्लिकन सरकारच्या अनेक खर्चांना डेमोक्रॅटिक सदस्यांचा विरोध होता. दरम्यान, अनेक सरकारी संस्थांना कामकाज चालविण्यासाठी पैसे न मिळाल्याने येत्या काही काळासाठी अमेरिका सरकार अंशत: ‘बंद’ असणार आहे.

- Advertisement -

लाखो कर्मचाऱ्यांपुढे ‘पेच’…

अमेरिकेत होणाऱ्या या शटडाऊनमुळे तेथील सुमारे ८ लाख सरकारी कर्मचाऱ्यांपुढे पेच निर्माण होणार आहे. शटडाऊनच्या काळामध्ये त्यांना एकतर सक्तीची रजा स्विकरावी लागू शकते, नाहीतर विनानेतन काम करावे लागू शकते. ऐन ख्रिसमच्या काळात ही परिस्थिती ओढवल्याने त्यांच्यात कमालीची नाराजी पसरली आहे. अमेरिकेमध्ये याच वर्षातलं हे तिसरं ‘शटडाऊनट’ आहे. चिंतेची बाब म्हणजे हे शटडाऊन अजून किती काळ सुरु राहिल, याबाबत कोणतीच स्पष्टता नाही.  अमेरिकेतील शेअर बाजाराला या शटडाऊनचा जोरदार फटका शुक्रवारी बसला असून, वॉल स्ट्रीटवरील बाजाराने जबर घसरण अनुभवली आहे. उपलब्ध माहितीनुसार, २००८ सालानंतरची ही सर्वात मोठी घसरण आहे. दरम्यान, याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार का? अशी चिंता वर्तवली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -