घरदेश-विदेशपंतप्रधान मोदींचा ६९ वा वाढदिवस, देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव!

पंतप्रधान मोदींचा ६९ वा वाढदिवस, देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव!

Subscribe

देश-विदेशातील प्रसिद्ध व्यक्ती, नेते मंडळी मोदींना सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज १७ सप्टेंबर रोजी ६९ वा वाढदिवस आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरातील अनेक राजकीय नेते, मंडळी आणि कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. पंतप्रधान मोंदीचा वाढदिवस आज असल्याने अनेक कार्यकर्त्यांनी आधीपासून तयारी करत आज एकच जल्लोष व्यक्त करताना दिसत असून अनेक कार्यक्रमाचंही आयोजन करत आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदाही पंतप्रधान मोदी गुजरातमध्ये आपला वाढदिवस साजरा करणार आहेत.

- Advertisement -

देशभरातून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात असून सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. ट्विटरवर पहिल्या १० ट्रेंडपैकी ७ ट्रेंड केवळ मोदींच्या वाढदिवसाशी संबंधित आहेत. यामध्ये #HappyBdayPMModi, #HappyBirthdayPM, #NarendraModiBirthday यासारखे हॅशटॅग्‍स ट्रेंडिंग आहेत. मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरातील त्यांचे समर्थक वेगवेगळ्या हॅशटॅगचा वापरून मोदींना शुभेच्छा देताना दिसत आहे.

देश-विदेशातील प्रसिद्ध व्यक्ती, नेते मंडळी मोदींना सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. ट्वीटरवर तर सोमवारी (१६ सप्टेंबर) रात्रीपासूनच #HappyBirthdayNarendraModi टॉप ट्रेंडमध्ये आहे.

- Advertisement -

देशभरातून शुभेच्छांचा होतोय वर्षाव…

भारतीय जनता पक्षाने ३.३१ मिनिटांचा एक व्हिडीओ ट्वीट करत पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

देशाचे गृहमंत्री आणि पंतप्रधान मोदींचे सर्वात निकटवर्तीय असलेले अमित शाह यांनींही ट्वीटरच्या माध्यमातून मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

“दृढ इच्छाशक्ती, निर्णायक नेतृत्व आणि अथक परिश्रमचे प्रतिक देशातील सर्वात लोकप्रिय नेते पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या नेतृत्वात भारताने जगात एक मजबूत, सुरक्षित आणि विश्वसनीय देशाच्या रुपात आपली ओळख बनवली आहे. विकासासोबतच भारतीय संस्कृतीला आणखी समृद्ध करण्यात मोदीजी यांचं अभूतपूर्व योगदान आहे”, असं ट्वीट अमित शाह यांनी केलं.

“मोदीजींनी एक रिफार्मिस्टच्या रुपात केवळ राजकारणाला एक नवी दिशाच दिली नाही, तर आर्थिक सुधारणेसोबतच दशकांपासून चालत आलेल्या समस्यांचं समाधानही काढलं. प्रत्येक भारतीयाच्या जीवानाला अधिक चांगलं बनवण्यासाठी तुमचे परिश्रम आणि संकल्प आमच्यासाठी एक प्रेरणास्त्रोत आहे. एक जनप्रतिनिधी, एक कार्यकर्ता आणि एक देशवासीच्या रुपात तुमच्यासोबत राष्ट्रीय पुनर्रचनेत भागीदार होणे हे माझं सुदैव आहे. तुम्ही नेहमी निरोगी राहावे आणि दीर्घायुषी व्हावे हीच देवाचरणी प्रार्थना”, असंही अमित शाह म्हणाले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही ट्वीटरच्या माध्यमातून मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

“नरेंद्र भाई, वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्ही निरोगी आणि दीर्घायुषी व्हावे, तसेच भारताला विश्व गुरु बनवण्याच्या आमच्या सर्वांच्या स्वप्नांना आम्ही तुमच्या नेतृत्वात पूर्ण करु, अशी प्रार्थना करतो”, असं ट्वीट गडकरींनी केलं आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनींही पंतप्रधानांच्या वाढदिवशी त्यांनी निरोगी आयुष्य आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत

केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनीही मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी मोदींना जगातील सर्वात करिश्माई नेता असल्याचं सांगितले आहे.

माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनीही मोदींचा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहे.

आसामच्या मुख्यमंत्र्यांनीही ट्वीटरवर मोदींना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनमी मोदींना नव्या भारताचे शिल्पकार म्हटले आहे.

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनीही मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. “एक नवीन भारत घडवण्यात तुमचं नेतृत्व आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे”, असं ट्वीट त्यांनी केलं.

केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनीही मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमूल कॉर्पोरेशनने देखील अनोख्या शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -