Video: पीएम मोदींनी केला चेन्नईचा महाबलीपुरम बीच ‘प्लास्टिकमुक्त’!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी ताज फिशरमॅन कोव रिसॉर्ट आणि स्पा या हॉटेलच्या बाहेर समुद्र किनाऱ्यावर स्वत: स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला.

Mumbai
narendra modi

चीन चे राष्ट्रपती शी चिनफिंग भारताच्या दौऱ्यावर आहेत. महाबलीपुरम येथे या दोन्ही बड्या नेत्यांची बैठक होणार आहे. महाबलीपुरममध्ये असलेल्या प्राचीन मंदीरांशी चीनचे वेगळे असे नाते आहे. याच कारणामुळे बैठकीसाठी यावेळी महाबलीपुरम शहराची निवड करण्यात आली आहे. शुक्रवारी या दोघांमध्ये महाबलीपुरम येथे चर्चा झाली. या दरम्यान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवर शेअर केलेला एक व्हीडीओ सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. हा व्हीडीओ खूप सुंदर आहे. हा व्हीडीओ शेअर करताना देशातील नागरिकांसाठी एक संदेशही दिला गेला आहे.

महाबलीपुरम समुद्रकिनाऱ्यावर मोदींचा स्वच्छतेसाठी पुढाकार

महाबलीपुरम समुद्रकिनाऱ्यावर मोदींचा स्वच्छतेसाठी पुढाकार

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಅಕ್ಟೋಬರ್ 11, 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी ताज फिशरमॅन कोव रिसॉर्ट आणि स्पा या हॉटेलच्या बाहेर समुद्र किनाऱ्यावर स्वत: स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला. प्लॅस्टीक बॉटल, प्लेट, आणि अन्य कचरा गोळा करत नागरिकांना संदेश दिला. यावेळी मोदींनी काळा टीशर्ट, पायजमा घातला होता. यावेळी हातात मोठी बॅग घेऊन मोदींनी स्वच्छता मोहिम केली.

पीएम नरेंद्र मोदी मामल्लपुरमच्या समुद्र किनाऱ्यावर मॉर्निंग वॉक करायला निघाले आणि व्यायमही केला. यावेळी त्यांचे फोटोही शेअर केले आहेत.