‘जागतिक सायकल दिना’च्या दिवशीच ‘ATLAS’ चं उत्पादन झालं बंद!

कंपनीने उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील साहिबाबाद स्थित आपला कारखाना चालवण्यात असमर्थता दर्शवली आहे

Ghaziabad

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन दरम्यान मात्र अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा येऊन बरेच कामकार बेरोजगार झाले आहे. सायकलमुळे आपोआपच सोशल डिस्टन्सिंग राखलं जात असल्यामुळे सरकारकडूनही सायकलिंगला प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र आज जागतिक सायकल दिन असून आजच्याच दिवशी प्रत्येकाने ऐकलेल्या नावाच्या ‘अॅटलस’ ब्रॅन्डने आपले सायकलचे उत्पादन मात्र बंद केले आहे.

प्रसिद्ध असणारी आणि नावाजलेली ‘अॅटलस सायकल’ ही कंपनी सध्या आर्थिक संकटाचा सामना करत असून या कंपनीने उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील साहिबाबाद स्थित आपला कारखाना चालवण्यात असमर्थता दर्शवल्याचे सांगण्यात येत आहे.

ही कंपनी बंद झाल्याने अनेक कर्मचाऱ्यांची नोकरी गेली आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे साधारण ४५० कर्मचाऱ्यांना थेट बेरोजगारीचा सामना करावा लागणार आहे तर जवळपास ७०० कर्मचाऱ्यांना अप्रत्यक्षरित्या परिणाम होणार असल्याची माहिती मिळतेय.

दरम्यान, कंपनीकडून आपल्या कर्मचाऱ्यांना नोटीस देखील देण्यात आली आहे. यामध्ये ‘कारखान्याच्या मालकांकडे हे काम सुरू ठेवण्यासाठी पुरेशी रक्कम नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी ३ जूनपर्यंत एक बैठक घ्यावी’ असे सांगण्यात आले आहे.

यासह कंपनीने असेही म्हटले की, गेल्या काही वर्षांत कंपनी आर्थिक संकटाचा सामना करत असून कंपनीजवळ कोणताही नाही. कोरोना काळात कंपनीकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याने दैनंदिन खर्चही भागवणे कंपनीला शक्य होत नाही. जोपर्यंत पैशांची सोय होत नाही तोपर्यंत कारखान्यात कच्चा माल येऊ शकणार नाही. अशा वेळी कारखाना सुरू ठेवणं शक्य नाही.


Mitron App तात्काळ करा डिलीट, महाराष्ट्र सायबर सेलचे आवाहन