घरदेश-विदेशअमृतसर- सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाला दोनदा पगार

अमृतसर- सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाला दोनदा पगार

Subscribe

पंजाब राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोनदा पगार जमा करण्यात आला. यामुळे राज्य सरकारकडून ४० ते ५० कोटी अधिक जमा करण्यात आले आहे.

दिवाळी सणाच्या निमित्ताने प्रत्येक कर्मचारी हा अधिक पगाराची अपेक्षा करत असतो. वर्षातून एकदाच दिवाळीसणात  कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची प्रथा आहे. या दिवाळीत पंजाब सराकारने कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात दोनदा पगार जमा करण्याची घटना उघडकीस आली आहे. जास्त पगार मिळाल्यामुळे पंजाब सरकारचे कर्मचारीही काही वेळ सुखावले होते. मात्र त्यांचा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही. तांत्रिक बिघाडामुळे दोनदा पैसे जमा करण्यात आले असून लकरवच त्यांच्या खात्यातून अधिक पैसे कापले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

दिवाळी गीफ्ट असल्याची समज

दिवाळी सणात सरकारने खात्यामध्ये दोनदा पैसे टाकून कर्मचाऱ्यांना गीफ्ट दिले असल्याची अफवा अधिकाऱ्यांमध्ये पसरली होती. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. पगार देण्यात चूक झाली असल्याचे जिल्हा खजिनदार ए.के.मेनई यांनी सांगितले. सरकारी अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर दोनदा पगार देण्यात आला आहे. याघटनेमुळे ४० ते ५० कोटींचे अधिक भार राज्य सरकारवर पडले असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -