रिलायन्स डिफेन्सचे राहुल गांधींना प्रत्युत्तर

राफेल विमान करारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अंबनी ग्रुपची मदत केली असल्याचा आरोप कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले होते. या प्रकरणी आतापर्यंत गप्प असलेले अंबनी यांनी आता राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले आहे.

New Delhi
Reliance-Defence
फाइल फोटो

राफेल कराराअंतर्गत पंतप्रधान नरेंद्रम मोदींनी रिलायन्स डिफेन्सची मदत केली असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केला होता. या आरोपाबद्दल आता रिलायन्स डिफेन्सकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राफेल प्रकरणी एका ईमेलचा दाखला देत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला होता. रिलायन्स डिफेन्स आणि एअरबस यांच्यातील संभाषण असलेल्या ईमेलमध्ये राफेल कराराचा उल्लेख केला असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता. मात्र या ईमेलमध्ये अशा कोणत्याच प्रकारचे संभाषण नसल्याचे कंपनीच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे. हा ईमेल रिलायन्स व एअरबस यांच्यातील संबंधित ईमेल ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाअंतर्गत येणाऱ्या नागरी व संरक्ष हेलिकॉप्टर कार्यक्रमासंबधीत असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

फ्रान्सकडून राफेल विमाने खरेदी करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करण्यापूर्वीच उद्योगपती अनिल अंबनी यांनी फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्याचवेळी भारताचे पंतप्रधानही फ्रान्सच्या दौऱ्यावर होते. सरकारने रिलायन्सला राफेल करारात नफा मिळवून दिला असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता. या प्रश्नावरून राहुल गांधींनी अनेकदा नरेंद्र मोदींकडे उत्तर मागितले होते. मात्र हा सुरक्षेचा भाग असल्यामुळे याची माहिती देता येत नसल्याचे सांगण्यात आले होते.