घरदेश-विदेशमोदींच्या भ्रष्टाचारमुक्त मोहिमेनंतरही सट्टाबाजारातील काळा पैसा दुप्पट?

मोदींच्या भ्रष्टाचारमुक्त मोहिमेनंतरही सट्टाबाजारातील काळा पैसा दुप्पट?

Subscribe

२०१४च्या तुलनेत २०१९ मध्ये सट्टाबाजारातील रक्कमेत वाढ; यंदा एक लाख कोटींची उलाढाल होण्याची शक्यता.

२०१४च्या तुलनेत यंदा सट्टाबाजारातील जुगाराच्या रकमेत वाढ झाली आहे. जवळपास दुप्पट रक्कम यंदाच्या लोकसभा निवडणूकांच्या निकालावर लावण्यात आली आहे. सट्टा बाजारावरील हा आकडा १ लाख कोटीपेक्षाही जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने भ्रष्टाचारावर सर्जिकल स्टाईक केल्याचे सांगितले जात असले, तरी यंदाच्या निवडणूक निकालांवरील सट्ट्यावरील लावलेला पैसा लक्षात घेता, काळ्या पैशांत वाढच झाल्याचे वास्तव समोर येत आहे.

काय सांगतो सट्टाबाजाराचा कल

एक्झिट पोलचे निकाल आणि सट्टाबाजाराचा अंदाज यात मोठा फरक आहे. मुंबईचा सट्टाबाजार असं सांगतोय की यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविलेल्या भाजपाला स्वबळावर जागा मिळणार नाहीत. सत्तेसाठी त्यांना मित्रपक्षांचा आधार घ्यावा लागणार आहे. दिल्लीचा सट्टाबाजारही हेच सांगत आहे. इंडिया टुडेने यासंदर्भात सविस्तर रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. मुंबई आणि दिल्लीच्या सट्टाबाजाराच्या अंदाजानुसार २३८ ते २४१ जागा मिळतील. मात्र राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेश येथील सट्टाबाजार भाजपाला आघाडी मिळेल असे सूतोवाच करत आहे. या प्रत्येक बाजारात जुगाऱ्यांचे कोट्यवधी रुपये पणाला लागलेले आहेत. राजस्थानच्या सट्टाबाजारात २००० हजार कोटी, तर मुंबईच्या सट्टाबाजारात १० ते १५ हजार कोटी रुपये लावण्यात आलेले आहेत. सट्टाबाजारातल पैशांचा नक्की अंदाज येत नसला, तरी त्यात शेकडो कोटी रुपये गुंतविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एका माहितीनुसार हा आकडा एक लाख कोटी रुपयांपार गेला असून २०१४ च्या तुलनेत दुप्पट आहे.

- Advertisement -

सट्टाबाजाराबद्दल काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?

निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्याचा प्रचार १७ मे रोजी सायंकाळी ५ वाजता संपला. तत्पूर्वी भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाच्या प्रचाराबद्दलची माहिती दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही उपस्थित होते. ते म्हणाले की पाच वर्षांपूर्वी याच दिवशी एक मोठा धमाका झाला होता. मोदी सरकार केंद्रात सत्तेत आले आणि सटोडियांचे कोट्यवधी रुपये बुडाले. कारण काँग्रेसला जास्त जागा मिळणार या गृहितकावर सटोडियांनी काँग्रेसला पसंती दिली. काँग्रेसच्या विजयावर जास्त पैसे लागले. पण झाले उलटेच. भाजपा स्वबळावर सत्तेवर आली आणि सट्टाबाजारात कोसळला. भ्रष्ट कारभार करणारे सटोडिया साफ बुडाले. भाजपा सत्तेवर येताच भष्ट्राचाराला बसलेला तो पहिला दणका होता. भाजपा मुख्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पक्षाच्या भ्रष्टाचार निर्मुलनाच्या मोहिमेबद्दल मोठ्या कौतुकाने सांगितले. मोदी सरकारने पाच वर्षांच्या कार्यकाळात भ्रष्टाचारावर आळा घातला, असेही ते म्हणाले. प्रत्यक्षात मोदींच्या विधानाला छेद देणारा प्रकार सट्टाबाजारातील गुंतवणूकीवरून समोर येत असून, पाच वर्षांच्या कार्यकाळानंतर सट्टाबाजारावर आळ बसण्याऐवजी त्यातील काळा पैसा दुप्पट झाल्याचे या रिपोर्टमधील प्राप्त माहितीवरून दिसून येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -