घरदेश-विदेशशेअर बाजारची ४२ अंकावर उसळी

शेअर बाजारची ४२ अंकावर उसळी

Subscribe

शेअर बाजाराने ऐतिहासिक उसळी घेतली असून सेन्सेक्स १७७ अंकांनी वधारुन ४२०५० अंकावर पोहोचला आहे.

शेअर बाजाराने ऐतिहासिक उसळी घेतली आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्ध मिटल्यानंतर त्याचा शेअर बाजारवर परिणाम दिसून आला आहे. गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने शेअर बाजारात सकाळच्या सत्रात सेन्सेक्स १७७ अंकांनी वधारुन ४२०५० अंकावर पोहोचला आहे.

अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारी संघर्ष मिटल्याने जागतिक बाजारपेठेवर याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. गेल्या १८ महिन्यापासून अमेरिका आणि चीनमधील व्यापारी संबंध बिनसले होते. त्यानंतर दोन्ही देशात समेट घडून आला आहे. त्याचबरोबर १ फ्रेबुवारीला देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प मांडला जाणार असून, या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदरांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. त्यामुळे शेअर बाजारने उसळी घेतली आहे. सकाळच्या सत्रात शेअर बाजार बीएसई (बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज) १७७ अंकानी वधारत ४२ हजार अंकांवर पोहोचला आहे. तर निफ्टीही (नॅशनल स्टॉक एक्स्चेंज) ५० अंकांनी वधारला असून १२,३७४.२५ वरून १२३८९.०५ अंकांवर पोहोचला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – लोकमान्य टिळक एक्स्प्रेसला अपघात, ४० प्रवाशी जखमी


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -