घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCoronavirus Lockdown: न्यूझीलंडमध्ये सेक्स टॉइजची विक्री जोरात

Coronavirus Lockdown: न्यूझीलंडमध्ये सेक्स टॉइजची विक्री जोरात

Subscribe

कोरोना व्हायरसच्या संसर्गाला रोखण्यासाठी जगातील अनेक देशांनी लॉकडाऊनचा पर्याय निवडलेला आहे. न्यूझीलंडमध्ये देखील राजपूत्र जसिंडा आर्डेनने एक महिन्याचा लॉकडाऊन घोषित केला. न्यूझीलंडमध्ये नागरिक फक्त अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी सुपरमार्केट आणि मेडिकलच्या दुकानांमध्ये जाऊ शकतात. दरम्यान लॉकडाऊनमुळे न्यूझीलंडमध्ये सेक्स टॉइजच्या विक्रीत तीनपटीने वाढ झाल्याचे समोर आले आहे. ही बातमी बाहेर आल्यानंतर जगभरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

न्यूझीलंडमधील सेक्स टॉइजचा सर्वात मोठा विक्रेता असलेल्या Adult टॉय मेगास्टोअरतर्फे सांगण्यात आले की, लोक त्यांच्या फावल्या वेळात प्रौढांसाठी लागणाऱ्या वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत. द गार्डियन या वृत्तपत्राला मेगास्टोअरच्या प्रवक्त्या इमिली राईट्स यांनी प्रतिक्रिया दिली. त्यात त्या म्हणतात की, “नव्याने टॉइजचा वापर करणारे ग्राहक बिगिनर टॉइजची मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. आमच्याकडे विविध तऱ्हेच्या बिगिनर टॉइजची खूप मोठी रेंज आहे. लोक म्हणतायत की माझ्याकडे खूप वेळ आहे. त्यामुळे आम्हाला काही तरी नवीन करायचे आहे.”

- Advertisement -

सध्या न्यूझीलंडमधील सेक्स टॉइजच्या वेबसाईटवर, कंडोम, लुब्रिकांट, मेनस्ट्रल कप्स आणि अॅडल्ट बोर्ड गेम्सची खरेदीवर लोकांच्या उड्या पडल्या आहेत. एवढेच काय तर सेक्स टॉय क्लिनर नावाचा प्रकार देखील लोक विकत घेत आहेत. न्यूझीलंडमध्ये अॅडल्ट टॉय मेगास्टोअरला अत्यावश्यक सेवेमध्ये टाकण्यात आलेले आहे. हे मेगास्टोअर कंडोम, तसेच इतर आरोग्यवियक वस्तूंची विक्री करते. त्यामुळे लॉकडाऊनमध्येही त्यांना विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

न्यूझीलंडच्या व्यतिरीक्त ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियात देखील अॅडल्ट मेगास्टोअरमधून मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. २१ आणि २२ मार्च रोजी या देशांमध्ये हॉटेल, बार बंद करण्यात आले होते. लोकांना बार, हॉटेल आणि डेटिंगला जायला मिळत नसल्यामुळे कदाचित सेस्क टाइजकडे त्यांनी मोर्चा वळवला असल्याची शक्यता, प्रवक्त्या राईट्स यांनी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -