घरदेश-विदेशचाइनीज वस्तूंवर बंदी आणून चीनवर दबाव आणता येईल का?

चाइनीज वस्तूंवर बंदी आणून चीनवर दबाव आणता येईल का?

Subscribe

पुलवामा हल्ल्याचा मास्टर माइंड पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरला जागतिक दहशतवादी ठरवण्यात चीनने आडकाठी केल्याने चीनी वस्तूंवर बंदीची मागणी जोर धरत आहे.

जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेच्या मसूद अजहरला संयुक्त राष्ट्र परिषदेत दहशतवादी घोषीत करण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांवर चीनने विरजन टाकले आहे. त्यामुळे सध्या सोशल मिडियावर चीन विरुद्ध भारतीयांच्या मनात प्रचंड राग व्यक्त होताना दिसत आहे. सोशल मिडियावर चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यात यावा आशी मागणी होत आहे. अत्तापर्यंत मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषीत करण्याच्या प्रस्तावाला चीनने तीनदा नकाराधिकार वापरला आहे. त्यामुळे चीन भारतीय नेटकऱ्यांच्या रडारवर आहे. भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये जेंव्हा केव्हा तणावजन्य परिस्थिती निर्माण होते, त्या प्रत्येक वेळी चीनी वस्तूंवर बंदीची मागणी हा विषय जोर धरतो. ऑल इंडिया ट्रेडर्स चीनी वस्तूंवर ३०० टक्के कर लावण्यात यावा असे सुचवले आहे. त्यामुळे चीनी वस्तूंच्या मागणीवर त्याचा परिणाम होईल.

यामुळे बंदी करणे अशक्य

- Advertisement -

भारत जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य आहे. त्यामुळे भारत जागतिक व्यापार संघटनेने घालून दिलेल्या नियमांच्या बंधनात आहे. जागतिक व्यापर संघटनेच्या नियमांनुसार कोणताही देश आयात वस्तूंवर अतिरिक्तकर लादू शकत नाही. २०१६ साली राज्यसभेतील एका प्रश्नाला उत्तर देताना त्यावेळी वाणिज्य मंत्री असलेल्या निर्मला सीतारमण यांनी भारत (WTO) जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांमध्ये बांधला गेल्याने चीनी वस्तूंवर पूर्णपणे बंदी आणु शकत नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यांनी सांगितल्या प्रमाणे आपल्याला केवळ एखाद्या देशाने बनवलेल्या काही वस्तू आवडत नाही. म्हणून आपण त्यावर बंदी आणु शकत नाही. त्यावर आपण तक्रार किंवा काही स्वरुपात बदलाची मागणी करु शकतो. मात्र ती देखील एक मोठी प्रोसेस असल्याचे त्यांनी सांगीतले.

बंदीचा चीनवर परिणाम

- Advertisement -

भारताने चीनी वस्तूंवर बंदी आणल्यास त्याचा चीनच्या अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम होणार नाही. कारण आर्थिक दृष्ट्या चीन केवळ भारतावर अवलंबून नसून अनेक देशांमध्ये चीनी वस्तूंची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. २०१७ मध्ये चीनच्या एकूण निर्यातीमध्ये भारताचा केवळ तीन टक्के इतकाच वाट आहे. चीनी अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यावस्थेपेक्षा पाच पट मोठी आहे. भारत चीनकडून जवळपास ७६ अरब डॉलर वस्तूंची आयात करतो. तर या तुलनेत भारताकडून चीन केवळ ३३ अरब डॉलर वस्तूंची आयात करते. भारत चीन कडून प्रामुख्याने मोबाईल फोन, इलेक्ट्रीकल्स वस्तू, प्लास्टिक, मशनरी आणि वस्तूंची आयात करतो, तर चीन भारता कडून कच्चा माल, कॉटन, खनिज ईंधन यांची आयात करतो. भारतीय अर्थव्यवस्थेच्या तुलनेत चीनी अर्थव्यावस्था अधिक मजबूत आहे. भारतात चीनी मोबाईलसाठी मोठ्या प्रमाणात बाजार पेठ उपलब्ध आहे. सगळ्यात जास्त चीनी मोबाइलची विक्री भारतात होते. त्यामुळे चीनी वस्तूंची बंदी हा पर्याय होऊ शकत नाही. त्यासाठी व्यापारी संतुलन राखणे गरजेचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -