Friday, January 15, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश स्पाईसजेटचा 'बुक बेफिकर सेल', फक्त ८९९ रुपयात करता येणार विमान प्रवास

स्पाईसजेटचा ‘बुक बेफिकर सेल’, फक्त ८९९ रुपयात करता येणार विमान प्रवास

१७ जानेवारीपर्यंत करता येणार तिकिट बुकींग

Related Story

- Advertisement -

गेल्या अनेक महिन्यापासून जगभरात फोफावणाऱ्या कोरोना विषाणूमुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकीला मोठ्याप्रमाणात आर्थिक फटका बसला. अशा परिस्थितीत प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी स्पाईसजेट या प्रसिद्ध विमान कंपनीने खास ‘बुक बेफिकर सेल'(Book Befikar Sale) ची घोषणा केली आहे. या सेलच्या माध्यमातून देशांतर्गत प्रवास करायचा असल्यास प्रवासी भाडे ८९९ रुपयांपासून सुरु होत आहे. या सेलमधून आजपासून तिकिट बुकिंग करता येणार असून या बुकिंगची शेवटी तारीख १७ जानेवारी आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसात हे तिकिट बुक करावे लागणार आहे. या सेलमधुन बुकिंग केल्यास १ एप्रिल ते ३० सप्टेंबरपर्यंत प्रवास करता येणार आहे.  देशातील प्रसिद्ध ठिकाण असलेल्या जम्मू ते श्रीनगर, श्रीनगर ते जम्मू, बेंगळूरु ते चेन्नई, चेन्नई ते बेंगळूरु, हैदराबाद ते बेळगावं, बेळगावं ते हैदराबाद, अहमदाबाद ते जैसलमेर, जैसरलमेर ते अहमदाबाद अशा अनेक विमान प्रवासी मार्गाने प्रवास करता येणार आहे. या ‘Book Befikar Sale’ मध्ये देशांतर्गत या उड्डाण मार्गांचे भाडे 899 रुपयांपासून सुरू होत आहे.

सर्वाधिक विमान प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने या सेलच्या माध्यमातून स्वतंत्र तिकीट व्हाउचरचीही घोषणा केली आहे. यासंदर्भात कंपनीने सांगितले की, या स्वतंत्र फ्लाइट तिकीट व्हाउचरची किंमत बुक केलेल्या तिकिटाच्या बेसिक किंमतीइतकीच असणार आहे. ज्यावेळी प्रवाशी या सेलच्या माध्यामातून तिकिट बुक करतील तेव्हा त्यांना प्रत्येक बुकिंगसाठी जास्तीत जास्त १००० रुपयांचे व्हाउचर मिळेल. या व्हाउचरचा वापर करुन आपण भविष्यातही तिकिट बुकिंग करु शकतो. हे फ्लाइट व्हाउचर 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत वैध असतील. फक्त देशांतर्गत उड्डाणांवर हे लागू असतील. या व्हाउचरला कमीतकमी 5,500 रुपयांच्या व्यवहाराच्या रक्कमेसोबत नव्याने बुकिंगवर पूर्तता केली जाऊ शकते. या सेलच्या माध्यमातून बुकींग करण्यात आलेले तिकिट रद्द करायचे असेल किंवा काही बदल करायचा असेल तर तो विमान सुटणाच्या २१ दिवसाआधी करावे लागणार आहे.

- Advertisement -