घरदेश-विदेशSushant Case Live Updates : माझा विश्वास आहे की मला न्याय मिळेल...

Sushant Case Live Updates : माझा विश्वास आहे की मला न्याय मिळेल – रिया

Subscribe

“माझा देव आणि न्यायव्यवस्थेवर अफाट विश्वास आहे. माझा विश्वास आहे की मला न्याय मिळेल … सत्यमेव जयते- रिया चक्रीवर्ती

- Advertisement -

अभिनेते शेखर सुमन यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन सुशांत सिंह राजपुत प्रकरणाची सी. बी. आय. मार्फत चौकशी करण्यासंदर्भात निवेदन दिले. यावेळी आस‍िफ भामला व अरुण मोटवानी उपस्थित होते.


मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पुराव्यांच्या आधारे पोलीस चौकशी करतील, आम्हाला अपेक्षित आहे की चौकशी लवकरात लवकर पूर्ण होईल आणि पोलीस एखाद्या निष्कर्षावर पोहचतील – जयंत पाटील

- Advertisement -

 

बिहार पोलिसांकडून निष्पक्ष चौकशीसाठी मुंबई पोलिस अडथळा आणत आहेत. सीबीआयने हे प्रकरण ताब्यात घ्यावे, अशी भाजपची भावना आहेः बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी व्यक्त केली.

 

विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, या प्रकरणी लोकांना वाटते सीबीआय चौकशी व्हावी मात्र राज्य सरकार त्यात आडकाठी करत आहे.


बिहार पोलीस येथे आले असावेत कारण तेथे स्वतंत्र तक्रार दाखल केली गेली होती. परंतु मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने आहे आणि योग्य चौकशी करेल. हा खटला सीबीआयकडे सोपविण्याची गरज नाही, महाराष्ट्र पोलीस तपास करण्यास सक्षम आहेत: महाराष्ट्राचे एमओएस होम


सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात ईडीची उडी, बिहार पोलिसांकडून FIR कॉपी ईडीला सुपूर्द


बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासात काल अनेक घडामोडी घडल्या. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या बिहार पोलिसांनी तपासाचा धडाका लावला. काल बिहार पोलिसांनी अभिनेत्री अंकिता लोखंडेची सुमारे तासभर चौकशी केली. त्याकरता बिहार पोलीस अंकिता लोखंडेच्या घरी पोहचले. यावेळी त्यांनी अंकिताची सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणी चौकशी केली. दरम्यान, आज सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी पाटणा राज्य पोलिसांकडून केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे (सीबीआय) चौकशीचे हस्तांतरण करण्याची मागणी करणारे एक पत्र याचिका पटना हायकोर्टात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -