घरदेश-विदेशकोरोनाचं संकट टळावं म्हणून पुजाऱ्याने दिला नरबळी; पुजाऱ्याला अटक

कोरोनाचं संकट टळावं म्हणून पुजाऱ्याने दिला नरबळी; पुजाऱ्याला अटक

Subscribe

ओडिशामध्ये एका पुजाऱ्याने कोरोनाचं संकट टळावं म्हणून का व्यक्तीला ठार करत देवीला बळी दिला. पोलिसांनी आरोपी पुजाऱ्याला अटक केली आहे.

ओडिशामध्ये कोरोना विषाणूच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. कटक जिल्ह्यातील नरसिंगपूर येथील एका मंदिराच्या पुजार्‍याने कोरोना संकट दुर व्हावं म्हणून एका व्यक्तीला ठार करत देवीला बळी दिला. नरसिंगपूर बांधुडा गावात बुधवारी रात्री एका व्यक्तीचा मृतदेह ब्राह्मण देवी मंदिर परिसरात सापडला. स्थानिक पोलिसांनी या हत्येत वापरलेली शस्त्रे जप्त केली आहेत. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. तसंच पुजाऱ्याने आपला गुन्हा कबूल केला आहे.

पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. संसारी ओझा (वय -७२) असं आरोपीचं नाव आहे. पोलिस अधीक्षक कटक राधा विनोद यांनी यासंदर्भात म्हटलं आहे की जुन्या ऋढींमुळे अशी घटना घडली आहे. आम्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविला आहे. या प्रकरणाचा तपासणी सुरू आहे.

- Advertisement -

स्वप्नात मिळाला बलिदानाचा आदेश

सरोजकुमार प्रधान असे मृताचे नाव आहे. आरोपीच्या मते, देवळात बलिदान देण्याबाबत त्याचा मृत व्यक्तीशी वाद होता. परिस्थिती बिकट झाल्यावर आरोपींनी सरोजकुमार प्रधानचा गळा कापून त्याला जागीच ठार केलं. आरोपीने चौकशीच्या वेळी सांगितलं की त्याला स्वप्नात देवाकडून आदेश प्राप्त झाले आहेत की बलिदान दिल्यास कोरोना विषाणूचे संकट थांबेल. आरोपी आणि मृत प्रधान यांच्यात आंब्याच्या बोगेवरुन अनेक दिवस वाद सुरू असल्याचा पोलिसांचा दावा आहे.


हेही वाचा – राज ठाकरेंच्या टीकेनंतर योगींनी ‘तो’ निर्णय घेतला मागे!

- Advertisement -

पोलीस डीआयजी मध्यवर्ती रेंज आशिष कुमार सिंग यांनी इंडिया टुडे या वृत्तसंस्थेला सांगितलं की, “घटनेच्या वेळी आरोपी नशेत असल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं आहे. सकाळी तो शुद्धीत आला तेव्हा तो स्वत: पोलिसांसमोर शरण गेला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -