घरदेश-विदेशदिल्ली हिंसाचार: ट्रम्प यांनी सांगितली मोदींची इच्छा

दिल्ली हिंसाचार: ट्रम्प यांनी सांगितली मोदींची इच्छा

Subscribe

दिल्लीत सीएए विरोधक आणि समर्थकांमधील वादामुळे गेले दोन दिवस दिल्लीत तणावाचे वातावरण आहे. यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी भाष्य केले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत भेटीवर असतानाच राजधानी दिल्लीत हिंसाचार उफाळला आहे. दिल्लीच्या जाफराबाद परिसरात काल (२४ फेब्रुवारी) भडकलेल्या हिंसेनंतर संपूर्ण दिल्लीमध्ये तणावाचे वातावरण आहे. कालच्या हिंसाचारात दिल्लीच्या एका पोलीस शिपायासह ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०० हून अधिकजण जखमी झाले आहेत. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर उत्तर-पूर्व दिल्लीच्या बऱ्याच भागांमध्ये १४४ कायद्याअंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दिल्लीत सुरु असलेल्या हिंसाचारावर डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले आहे.

दोन दिवसांच्या दौऱ्या अखेरीस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पत्रकार परिषद झाली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी चर्चा केली. आमच्यात धार्मिक स्वातंत्र्याबद्दल चर्चा झाली. भारतातील लोकांना धार्मिक स्वातंत्र्य मिळावे, अशी मोदी यांची इच्छा आहे. हे मला त्यांनी चर्चेवेळी सांगितले. देशातील धार्मिक स्वातंत्र्यावर त्यांनी कठोर परिश्रम केले आहेत. झुंडबळीबद्दल मी ऐकले, पण मी त्याबद्दल चर्चा केली नाही. त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार भारताला आहे,” असे ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

- Advertisement -

दिल्लीमधील हिंसाचाराने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिल्लीत शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून केजरीवाल यांनी राजघाटावर प्रार्थन केली. गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत हिंसाचार सुरू आहे. यामध्ये काहींनी प्राण गमावलेत. तर अनेकांच्या मालकत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या हिंसाचाराचा फटका प्रत्येकाला बसेल. यामुळे गांधीजींच्या अंहिसेच्या मार्गावर चालण्यातच सर्वांच हित आहे. म्हणून शांतता निर्माण होण्यासाठी आम्ही येथे प्रार्थना करतोय, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -