डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य; कामावर पुन्हा रुजू होण्याचे ममतादीदींचे आवाहन

New Delhi
Mamata Banerjee
प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

मागच्या पाच दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या डॉक्टरांच्या आंदोलनानंतर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. तसेच त्यांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहन देखील केले आहे. पाच दिवस आंदोलन केले तरीही डॉक्टरांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. तसेच डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांना तुरुंगात टाकू, अशी ग्वाही ममता बॅनर्जी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

ममता बॅनर्जी पत्रकार परिषदेत म्हणाल्या की, “राज्यातील ज्युनिअर डॉक्टर पाच दिवस संपावर गेले होते, तरिही आम्ही त्यांच्यावर एस्मा अंतर्गत कारवाई करणार नाहीत. मला वाटतं ज्युनिअर डॉक्टर्सनी देखील कामावर रुजू व्हावे.” अत्यावश्यक सेवा खंडीत होऊ नये यासाठी केंद्र सरकारने एस्मा कायदा आणला होता. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि आरोग्य सेवेसारख्या अत्यावश्यक सेवा सामान्य माणसाला अखंडित स्वरुपात मिळाव्यात या उद्देशाने हा कायदा केला गेलेला आहे.

तसेच आम्ही एकाही व्यक्तीविरोधात फौजदारी कारवाई करणार नाहीत. आंदोलनाच्या वातावरणात लोकांना चांगली आरोग्यसेवा देणे कठीण आहे. त्यामुळेच मी कोणतीही कारवाई करणार नसल्याचे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here