घरदेश-विदेशभाारतात न्याय मिळणार नाही - विजय माल्ल्या

भाारतात न्याय मिळणार नाही – विजय माल्ल्या

Subscribe

निष्पक्ष सुनावणीचा अभाव आणि राजकारण्यांनी स्वार्थासाठी माझ्यावर आरोप केले. त्यामुळे मला भारतात न्याय मिळेल की नाही याबद्दल शंका वाटते अशी उलटी बोंब भारतीय बँकांचे हजारो कोटी रूपये बुडवून परदेशात पळालेल्या विजय माल्ल्यानं मारली आहे.

निष्पक्ष सुनावणीचा अभाव आणि राजकारण्यांनी स्वार्थासाठी माझ्यावर आरोप केले. त्यामुळे मला भारतात न्याय मिळेल की नाही याबद्दल शंका वाटते अशी उलटी बोंब भारतीय बँकांचे हजारो कोटी रूपये बुडवून परदेशात पळालेल्या विजय माल्ल्यानं मारली आहे. विजय माल्ल्याला भारताच्या हवाली करायचं की नाही? यावर इंग्लंडच्या न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार आहे. २०१६ साली भारतीय बँकांचे ९ हजार कोटी बुडवून विजय माल्ल्या परदेशी फरार झाला आहे. त्या प्रत्यापर्णसाठी भारत सध्या प्रयत्न करत आहे. विजय माल्ल्याला भारतात आणण्यासाठी आता भारतीय बँकांनी इंग्लंडच्या न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. भारतीय मीडियानं मला पोस्टर बॉय बनवले अशा शब्दात विजय माल्ल्यानं भारतातील प्रसार माध्यमांना धारेवर धरलं आहे. पण, आता विजय माल्ल्याच्या प्रत्यापर्णावर काय निर्णय होणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.

लंडनमधील राहतं घर देखील गमवण्याची विजय माल्ल्यावर वेळ आली आहे. त्यानंतर माल्ल्यानं केवळ मुद्दल देतो व्याज सोडा अशी विनंती देखील भारतीय बँकांना केलेली आहे. विजय माल्ल्याला भारतात आणण्यासाठी भारतीय यंत्रणा पूर्णपणे तयारी करत आहे. भारतात आणल्यानंतर त्याला मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्याच्या जेलमधील खोलीचा व्हिडीओ देखील मुंबई पोलिसांनी लंडनमधील न्यायालयामध्ये सादर केला आहे.

- Advertisement -

पण, आता भारतात न्याय मिळेल की नाही याबद्दल शंका वाटते अशी बोंब विजय माल्ल्यानं मारली आहे. विजय माल्ल्याचा हा युक्तीवाद आता लंडनच्या न्यायालयामध्ये किती टिकतो? त्यावर न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

वाचा – विजय माल्ल्या म्हणतोय ‘हे घ्या पैसे’…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -