दिवाळी संचाला वाढती मागणी

Mumbai
दिवाळी अंक

दिवाळी म्हणजे साहित्य वाचकांसाठीही खास मेजवानी. दिवाळीमध्ये वेगवेगळे दिवाळी अंक प्रसिद्ध होत असतात आणि त्यांना मागणीही खूप चांगली असते. मराठीचे वाचक कमी झाले आहेत अशी बर्‍याच ठिकाणी बोंब असतानाही दिवाळी अंकांना मात्र चांगलीच मागणी आहे. इतकंच नाही तर सध्या दिवाळी संचाला वाढती मागणी असल्याचं दिसून आलं आहे. यामध्ये अक्षर, दिपावली, कालनिर्णय सांस्कृतिक, ऋतूरंग, महाराष्ट्र टाइम्स आणि अनुभव असे सहा दिवाळी अंक तसेच आठवणीतला दिवस, सुखी माणसाचा सदरा यासारख्या चार पुस्तकांपैकी एक पुस्तक वाचकाने निवडायचे आणि मॅजेस्टिकची डायरी असा एक संपूर्ण संच असतो. ही इतकी मोठी साहित्याची मेजवानी दिवाळीनिमित्त १२४५ रूपयांऐवजी ९७० रूपयाला मिळत असल्यामुळेच वाचक सध्या दिवाळी संचाला जास्त प्राधान्य देत असल्याचं मॅजेस्टिकच्या अशोक कोठावळे यांनी आपलं महानगरला सांगितले.

दिवाळी अंकांचा खप कमी झाला अशी बर्‍याच लोकांची चर्चा असताना मात्र विविध अंक असतात. प्रत्येक वाचक वेगळा असतो. त्यामुळे आपल्या आवडीप्रमाणे वाचक दिवाळी अंक घेत असतो असंही त्यांनी पुढे सांगितलं. त्यामुळे यावर्षीदेखील दिवाळी अंकांचा खप कमी झालेला नसून वाचनाची आवड असलेले लोक आपापल्या आवडीप्रमाणे अंक घेत असल्याचे सांगण्यात आले आहे. केवळ पॉलिटिकलच नाही तर मोहिनी, जत्रा आणि आवाज सारखे अंकही वाचकांना आवडतात. कारण अशा अंकांनी आपला दर्जा राखून ठेवला असल्यामुळे वाचक नियमित आहेत असेही यावेळी अशोक कोठावळे यांनी स्पष्ट केले.

दिवाळीमध्ये नेहमीच दर्जेदार दिवाळी अंकांना चांगली मागणी असते. पण त्याहीपेक्षा सहा दिवाळी अंक एकत्र संचामध्ये आहेत. त्याव्यतिरिक्त नावाजलेल्या लेखकांपैकी एकाचे पुस्तक आणि डायरी ज्याच्या सुरुवातीला लेख असून पुढे तुम्हाला ती तुमच्यासाठीही वापरता येते असे संचाचे स्वरुप असल्यामुळेच या दिवाळी संचाला जास्त मागणी आहे. या संचासाठी अग्रीम नोंदणीही करण्यात येत आहे.
– अशोक कोठावळे, प्रकाशक, मॅजेस्टिक प्रकाशन

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here