Friday, January 15, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन ड्रिम गर्ल पुन्हा झाली जुळ्या मुलांची आजी

ड्रिम गर्ल पुन्हा झाली जुळ्या मुलांची आजी

इशा देओलनेही तिच्या चाहत्यांना आपण मावशी झाल्याची बातमी दिली

Related Story

- Advertisement -

ड्रिम गर्ल अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेता धर्मेंद्र हे पुन्हा एकदा आजी आजोबा झाले आहेत. यावेळी मात्र एक नाही तर दोन जुळ्या मुलांचे आजी आजोबा झाले आहेत. हेमा मालिनी यांची मुलगी आहानाने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. २५ नोव्हेंबरला आहानाने जुळ्या मुलींच्या जन्माची गोड बातमी दिली. आहानाने तिच्या सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे. मुलींच्या जन्मामुळे देओल आणि वोहरा कुटुंब आनंदात दिसत आहेत.

अस्त्रिया आणि अदिरा अशी दोन मुलींची नावे ठेवली आहेत. मुलींचा आगमनाने आहाना आणि तिचा पती वैभव वोहरा हे खूप आनंदात आहेत. त्याचप्रमाणे जुळ्या नातींचे आजी आजोबा झाल्याने अभिनेत्री हेमा मालिनी खूप आनंदात दिसत आहे. आहानाने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केले आहेत. इशा देओलनेही तिच्या चाहत्यांना आपण मावशी झाल्याची बातमी दिली आहे. इशाने तिच्या सोशल मीडियावर जुळ्या मुलींच्या स्वागताची एक पोस्ट शेअर केली आहे.

- Advertisement -

आहाना आणि वैभव यांनी २०१४ मध्ये लग्नगाठ बांधली. आहाना आणि वैभव यांना डॅरिअन नावाचा एक मुलगाही आहे. त्यांच्या घरात पुन्हा एकदा दोन चिमुकल्या मुलींचे आगमन होणार आहे. गेल्या वर्षीच आहानाची मोठी बहिण इशा देओलचेही लग्न झाले. इशाला राध्या आणि मिराया या दोन मुली आहेत. दोन जुळ्या नातींच्या आगमनामुळे हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांना पुन्हा एकदा आजी आजोबा होण्याची संधी मिळाली.


हेही वाचा – नटसम्राट पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर

- Advertisement -

 

 

- Advertisement -