पूनम पांडे चक्क नवरीच्या वेषात; हे शूट नाही खरोखर लग्न केलंय तिने

Model Poonam Pandey gets married with her boyfriend sam

बोल्डनेसमुळे नेहमी चर्चेत असलेली मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेने लग्न केलं आहे. हो, तिने लग्न केलं आहे. पूनमने तिचा प्रियकर सॅमसोबत लग्न केलं आहे. याची माहिती तिने इंस्टाग्रामवरुन दिली आहे. लग्नाचे वधूच्या ड्रेसमधील फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

लग्नाच्या या खास प्रसंगी पूनम आणि सॅमने एकाच रंगाचे कपडे घातले आहेत. पूनमने नेव्ही ब्लू कलरचा लेहेंगा घातला आहे. तर सॅमने निळ्या रंगाची शेरवानी परिधान केली आहे. फोटो शेअर कॅप्शनमध्ये पूनमने “मला पुढील सात जन्म तुझ्या सोबत रहायचं आहे,” असं लिहलं आहे. यावर सॅमनेही कमेंट केली आहे. पूनम आणि तिच्या लग्नाच्या फोटोवर कमेंट करताना सॅमने ‘एब्सोल्युटली मिसेस बॉम्बे,’ असं लिहिलं आहे.

 

View this post on Instagram

 

Here’s looking forward to seven lifetimes with you.

A post shared by Poonam Pandey (@ipoonampandey) on

सॅमने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटोसुद्धा शेअर केले आहेत, ज्यात पूनम एका फोटोमध्ये तिला मेहंदी दाखवताना दिसत आहे, तर दुसर्‍या फोटोमध्ये ती ब्राइडल लूकमध्ये दिसली आहे. सॅम आणि पूनमचं नातं आधीच सार्वजनिक होतं. दोघे अनेकदा एकत्र दिसतात. पूनम नेहमीच तिचे सॅमसोबतचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करते. फोटोंमध्ये दोघांची केमिस्ट्री खूपच बोल्ड दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

Mr & Mrs Bombay

A post shared by Sam Bombay (@sambombay) on