घरमनोरंजनयावेळी माणसांशी होणार 'मोगली'चा सामना

यावेळी माणसांशी होणार ‘मोगली’चा सामना

Subscribe
– वॉर्नर ब्रदर्सच्या ‘मोगली’चा ट्रेलर रिलीज
– भारतीय वंशाचा रोहन चांद मोगलीच्या भूमिकेत, तर फ्रीडा पिंटोची भूमिका

 

वॉर्नर ब्रदर्सने आपला चित्रपट ‘मोगली’चा ट्रेलर आज रिलीज केला आहे. मोगली हा भारतातील सर्वच मुलांचा आवडता हिरो आहे. जंगलातील प्राण्यांबरोबर एका लहान निष्पाप मुलाची मैत्री ही संकल्पना नेहमीच प्रेक्षकांनी उचलून धरली. मात्र यावेळी हा ‘मोगली’ एका नव्या कथेसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट म्हणजे ‘द जंगल बुक’ च्या पुढील कथा आहे. या ट्रेलरवरून ही मोगलीच्या जिवंत राहण्याची गोष्ट असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
या चित्रपटाचा महत्त्वाचा गाभा आहे म्हणजे त्याचे व्हिज्युअल्स आणि अॅनिमेशन. यामुळे चित्रपटाला एक भव्यदिव्य रुप प्राप्त झालंय. मागच्या चित्रपटाप्रमाणेच बघीरा आणि बल्लू यामध्ये मोगलीची साथ देताना दिसणार आहेत. याशिवाय शेरखान मोगलीचा दुश्मनच असणार आहे. मात्र, यावेळी चित्रपटात अनेक व्यक्तिरेखा प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच ही कथा नक्की काय आहे याचा अंदाज येणार आहे.
याआधी २०१६ मध्ये आलेल्या ‘द जंगल बुक’ मध्ये मोगलीच्या लहानपणाची गोष्ट दाखवण्यात आली होती. मोगली जंगलातील एक भाग कसा बनतो आणि बघीरा आणि बल्लू त्याचे कसे मित्र बनतात, त्याशिवाय शेरखान कसा त्याचा दुश्मन होतो आणि बदला घेतो याभोवती ती कथा होती. यापुढे आता पुढील चित्रपटात नक्की काय घडणार हे पाहणे मनोरंजनात्मक असणार आहे.
मोगलीची भूमिका भारतीय वंशाचा रोहन चांद साकरणार असून फ्रीडा पिंटोचीदेखील यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. हा संपूर्ण चित्रपट ३ डी मध्ये असून जगभरात १९ ऑक्टोबर, २०१८ रोजी प्रदर्शित होईल. तर हा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर फारच कमी वेळात २,६४९,७०३ इतके व्ह्यूज असून सध्या ७ व्या क्रमांकावर हे ट्रेलर ट्रेंडिगला आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisement -

मोगली चित्रपटाचा ट्रेलर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -