आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

Mumbai
Horoscope 33
राशी भविष्य

मेष :- कष्टाचे काम केल्याने थकवा जाणवेल. प्रकृतीची काळजी घ्या. भेटीत अडचणी येतील. तणाव होऊ शकतो.

वृषभ :- घरातील माणसांच्या मदतीने काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू शकाल. जीवनसाथीला खूश ठेवता येईल. वरिष्ठांना खूश ठेवा.

मिथुन :- ठरविलेला कार्यक्रम पूर्ण करण्यात अडथळे येतील. जिद्द ठेवा. गोड बोलून तुमचे काम करण्याचा प्रयत्न करा. संयम ठेवा.

कर्क :- इतरांच्या मतानुसार वागल्यास अडथळे कमी होऊ शकतात. घरातील व्यक्तींची मदत घ्या. वरिष्ठांना समजुतीने समस्या सांगा.

सिंह :- अहंपणा न ठेवता वागा, रागावर नियंत्रण ठेवा. तुमचे मुद्दे पटवून द्या. वाट पहा. घाई नको.

कन्या :- जवळच्या व्यक्तींची नाराजी दूर करण्याची संधी सोडू नका. नोकरीत वरिष्ठ खूश होतील. अंदाज बरोबर येऊ शकतो.

तूळ :- धंद्यात वाढ होईल. प्रेमाच्या व्यक्तींची भेट घेता येईल. कोर्ट केसमध्ये चांगला मुद्दा हाती लागू शकतो. प्रयत्न करा.

वृश्चिक :- मनाची चंचलता होईल. अंदाज बरोबर येण्यासाठी संयम ठेवा. वाहन जपून चालवा. प्रेमाच्या माणसाबरोबर क्षुल्लक वाद.

धनु :- नियमितपणा राखण्यात खंड पडू शकतो. नवीन परिचय होईल. कामास विलंब होईल. रस्त्याने सावधपणे चाला.

मकर :- महत्त्वाच्या भेटीत यश मिळू शकेल. आजचे काम आजच करा. चर्चा सफल होईल. संततीची मदत मिळेल. चांगले पदार्थ खाण्यास मिळेल.

कुंभ :- घरगुती समस्या सहज पूर्ण होतील. मौजमजेत वेळ जाईल. धंद्यात फायदा होईल. विचारांना चालना मिळेल.

मीन :- अडचणीत आलेली कामे पूर्ण करा. धंदा मिळेल. भावनेच्या भरात कुणावरही एकदम विश्वास ठेऊ नका. खर्च वाढेल. वाहनांची खरेदी कराल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here