घरमनोरंजनमेहताबची सतारमधली कामयाबी

मेहताबची सतारमधली कामयाबी

Subscribe

उस्ताद मोहसिन अली खान हे स्वत: उत्तम सतारवादक आहेत. मुलगा मेहताब हा लहान असताना केवळ गंमत म्हणून रियाज करताना अनेक वेळा मेहताबला सतार वाजवायला देत होते. वयाच्या चौथ्या वर्षापासून तो आपल्या पद्धतीने सतारची तार छेडत होता. त्यात त्याच्या वडिलांचे अनुकरण होते, त्यामुळे कुतूहल वाटावे असे काहीच नाही अशा उद्देशाने घरातील सदस्य पहात होते. प्रख्यात नर्तक पं. बिर्जू महाराज यांच्या वाढदिवसाचे निमित्त घेऊन ज्या बालकलाकारांना वादन करण्यासाठी निमंत्रित केले होते, त्यात मेहताब हाही होता. त्यावेळी त्याचे वय अवघे सहा वर्षांचे होते. आश्चर्याचा धक्का बसेल असे काहीसे त्याचे कौतुक झाले आणि मग या छोट्या उस्तादलाही सतारीचे शिक्षण द्यायला हवे याची जाणीव झाली. भारतभर सतार वादनाचे कार्यक्रम करणारा हा दिल्लीतला युवक ‘एक उगवता तारा’ या उपक्रमात शुक्रवार १ फेब्रुवारी मुंबईतील ष्णमुखानंदच्या पद्मा रंगा या सभागृहात कार्यक्रम करणार आहे.

भेंडी बाजार घराण्याचा ‘मेहताब’ हा गुणी कलाकार आहे. श्री ष्णमुखानंद फाईन आर्टस आणि संगीत सभा ही प्रत्येक महिन्याला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला पूर्णपणे वाहून घेतलेल्या एका गायकाला किंवा वादकाला ही संधी देत असते. यावेळी मेहताब हा सतारीवर काही धुन वाजवून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहे. सतारवादनातील एक वेगळा लहेजा त्याने निर्माण केलेला आहे जो रसिकांना अधिक भावतो. भारतीय शास्त्रीय संगीत जगभर पसरावे असा त्याचा मानस आहे. हा कार्यक्रम विनामूल्य आहे ज्यात मेहताबची सतारमधील कामयाबी अनुभवायला मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -