घरभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यराशीभविष्य रविवार 2 फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी २०२०

राशीभविष्य रविवार 2 फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी २०२०

Subscribe

मेष : या सप्ताहात मीन राशीत शुक्र, धनु राशीत मंगळ प्रवेश करीत आहे. चंद्र गुरु प्रतियुती होत आहे. धंद्यात वाढ होईल. भागीदाराशी जुळवून घ्या. नोकरीत चांगला बदल शक्य होईल. कंपनीद्वारा परदेशात जाण्याची संधी मिळेल. घरगुती किरकोळ नाराजी होईल. खर्च वाढेल. घर, वाहन, खरेदीचा विचार करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे नेतृत्व प्रभाव ठरेल. जवळचे लोक आपसात तणाव निर्माण करतील. त्यावर वचक ठेवावा लागेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी, पैसा मिळेल. कोर्ट केस जिंकाल. शिक्षणात योग्य निर्णय घेऊन प्रगती कराल. शुभ दि. ३, ४
शुभ दि. २६, २७

वृषभ : या सप्ताहात मीन राशीत शुक्र, धनु राशीत मंगळ प्रवेश करीत आहे. मीन राशीत शुक्र उच्चीचा असतो. वृषभ व्यक्तींना त्यांचा फायदा होईल. कला क्षेत्रात विशेष यश मिळवाल. नवीन ओळखी होतील. धंद्यात वाढ करता येईल. नोकरीत टिकाव लागेल. रागावर रविवारी ताबा ठेवा. वाहन जपून चालवा. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. वरिष्ठांचे मन ऐकून निर्णय घ्या. प्रतिष्ठा वाढेल. घरातील समस्या सोडवाल. कौटुंबिक सौख्यात भर पडेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. कोर्ट केस जिंकाल. शिक्षणात आळस नको. कष्ट घ्या. म्हणजे पुढे फायदा होईल. शुभ दि. ४, ६

- Advertisement -

मिथुन ः या सप्ताहात मीन राशीत शुक्र, धनु राशीत मंगळ प्रवेश करीत आहे. धंद्यात संधी मिळेल. नवे काम मिळवा. वसुली करा. सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीत तणाव होईल. वादविवादात पडू नका. नोकरी टिकवा. मोहाच्या जाळ्यात अडकाल. राजकीय-सामाजिक कार्यात गुप्त कारवायांनी त्रस्त व्हाल. अनेक प्रश्न सोडवणे कठीण वाटेल. घरगुती खर्च वाढेल. आप्तेष्ठ जवळची माणसे मदत करतील. कला-क्रीडा क्षेत्रात नवीन संधी मिळेल. ओळखीमुळे तुम्ही उत्साहीत व्हाल. वाहन जपून चालवा. कोर्टाच्या कामात सतर्क रहा. शिक्षणात चंचलपणा करू नये. शुभ दि. 7, 8

कर्क : मीन राशीत शुक्र प्रवेश, धनु राशीत मंगळ प्रवेश करीत आहे. विरोधकांना स्पष्टपणे उत्तर द्याल. गदारोळ उठण्याची शक्यता आहे. धंद्यात लक्ष द्या. वेळेत काम पूर्ण करा. नोकरमाणसे अडचणी निर्माण करतील. नोकरीत वर्चस्व करा. घरात खर्च वाढेल. वाटाघाटीत तणाव होईल. संयम ठेवा. पुढे संधी मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात तडफदारपणा दिसेल. आक्रमकता नियंत्रणात ठेवा. वाहन जपून चालवा. कला-क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी कराल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. शिक्षणात धरसोडवृत्ती ठेऊ नका. मेहनत घ्या. शुभ दि. २, ४

- Advertisement -

सिंह : या सप्ताहात मीन राशीत शुक्र, धनु राशीत मंगळ प्रवेश करीत आहे. चंद्र गुरु प्रतियुती होत आहे. ‘जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण’ या कमीची तुम्हाला जाणीव होईल. राजकारणात तारेवरची कसरत करावी लागेल. मनावर दडपण येईल. धंद्यात जम बसेल. वसुली करा. नोकरीत व्याप वाढेल. वर्चस्वासाठी परिश्रम वाढवावे लागतील. गुप्त कारवाया वाढतील. मनशक्ती टिकवा. कला-क्रीडा स्पर्धेत अटीतटीचा सामना होईल. कोर्टाच्या कामात मदत घेता येईल. शिक्षणात अरेरावी नको. इतरांच्या सांगणावरून तुम्ही निर्णय बदलू नका. सल्ला घ्या. शुभ दि. २, ४

कन्या ः या सप्ताहात मीन राशीत शुक्र, धनु राशीत मंगळ प्रवेश करीत आहे. सूर्य चंद्र त्रिकोणयोग होत आहे. रविवार तुमचा अंदाज चुकण्याची शक्यता आहे. घरात वाद होईल. संयम ठेवा. वस्तू नीट सांभाळा. धंद्यात अडचण मिळणे सोपे नाही. नोकरीत तुमचा रूबाब राहील, परंतु लोकांना दुखवू नका. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा टिकवता येईल. कोणताही निर्णय रागाच्या भरात घेऊ नका. कला-क्रीडा क्षेत्रात संधी मिळेल. कोर्टाच्या कामात यश खेचावे लागेल. विद्यार्थ्यांनी महत्त्वाचे विषय नीट अभ्यासावेत. व्यसन करू नये. शुभ दि. ४, 6

तूळ ः या सप्ताहात मीन राशीत शुक्र, धनु राशीत मंगळ प्रवेश करीत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला दगदग होईल. धंद्यात वाढ होईल. काम वाढेल. प्रवासात घाई करू नका. नोकरीत वरिष्ठांचा दबाव नकोसा वाटेल. नोकरी सोडू नका. खंबरीपणाने कामे करावी लागतील. राजकीय-सामाजिक कार्यात जबाबदारी वाढेल. लोकांच्या समस्या सोडवणे सोपे नाही असे वाटेल. वरिष्ठांच्या मदतीशिवाय सर्व अशक्य होईल. नमते धोरण ठेवा. भावना व व्यवहार नीट समजून घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात कौतुक होईल. मौल्यवान खरेदी कराल. कोर्ट केसमध्ये जिकाल. शिक्षणात एकाग्र रहा. शुभ दि. ६, ७

वृश्चिक ः या सप्ताहात मीन राशीत शुक्र, धनु राशीत मंगळ प्रवेश करीत आहे. धंद्यात सुधारणा सप्ताहाच्या सुरुवातीलाच करा. रविवार रागावर ताबा ठेवा. संयमाने प्रश्न चर्चा करा. वाहन जपून चालवा. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. मनाप्रमाणे बदली करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात आत्मविश्वासाने निर्णय घ्याल. गुप्त कारवायांना तोंड द्यावे लागेल. कला क्षेत्रात चमकाल. क्रीडा क्षेत्रात पराक्रमी घोडदौड कराल. कोर्टमध्ये यश मिळेल. शिक्षणात आळस नको. चंचलपणा करू नका. चांगली संगत ठेवा. घरातील समस्या सोडवता येईल. शुभ दि. ३, 4

धनु ः– या सप्ताहात मीन राशीत शुक्र, धनु राशीत मंगळ प्रवेश करीत आहे. साडेसाती सुरू आहे. धंद्यात काम मिळवता येईल; पण वादाचा प्रसंग कुठेही निर्माण होऊ शकतो. रागावर ताबा ठेवा. वाहन जपून चालवा. दुखापत टाळा. वाहन जपून चालवा. दुखापत टाळा. नोकरीत प्रभाव पडेल. काम वाढेल. नवीन बदल करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात गुप्त कारवार्‍यांचा त्रास होईल. त्यातून मार्ग काढावा लागेल. प्रतिष्ठा व लोकप्रियता टिकवता येईल. कला-क्रीडा विभागात प्रसिद्धी मिळेल. कोर्टकेस किचकट वाटेल. शिक्षणात चंचलपणा करू नका शुभ दि. २, ६

मकर ः– या सप्ताहात मीन राशीत शुक्र, धनु राशीत मंगळ प्रवेश करीत आहे. साडेसाती सुरू आहे. सप्ताहाच्या शेवटी प्रवासात सावध रहा. काम करताना काळजी घ्या, दुखापत होऊ शकते. धंद्यात वाढ करता येईल. रागावर ताबा ठेवा. नोकरीत काम वाढले तरी वरिष्ठांना खूश करता येईल. संसारात चांगली बातमी कळेल. मुले प्रगती करतील. कला-क्रीडा क्षेत्रात पुढे जाल. कोर्टाच्या कामात यश खेचता येईल. शिक्षणात आळस नको, तरच यश मिळेल. शोध मोहीम प्रगतीकारक ठरेल. शुभ दि. २,४

कुंभ ः- या सप्ताहात मीन राशीत शुक्र प्रवेश, धनु राशीत मंगळ प्रवेश करीत आहे. साडेसाती सुरू आहे. धंद्यात सुधारणा करता येईल. ओळखीतून काम मिळेल. नोकरीत अडचणी येतील. वरिष्ठांच्या विरोधात जाऊ नका. घरातील माणसे तुम्हाला मदत करतील. नवीन ओळखी होतील. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिक्रिया व्यक्त करताना उतावळेपणा करून चालणार नाही. गुप्त कारवाया अधिक होतील. कला-क्रीडा क्षेत्रात स्पर्धा वाढेल. कोर्ट केस कठीण वाटेल. विद्यार्थी वर्गाने जिद्द ठेवावी. यश मिळेल. शोध मोहिमेत चूक संभवते. शुभ दि. २,6

मीन ः- या सप्ताहात तुमच्याच राशीत शुक्र प्रवेश, धनु राशीत मंगळ प्रवेश करीत आहे. धंद्यातील अडचणी सोडवता येतील. चर्चा संयमाने करा. वसुली करण्याचा प्रयत्न करा. नोकरीत कामाची चतुराई दिसेल. घर, वाहन, जमीन खरेदी करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात योजना मार्गी लावता येईल. जनहितांचा विचार करा. घरातील समस्या सोडवता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात नवीन ओळखी होतील. कला क्षेत्रात विशेष प्रगती कराल. प्रेमाला चालना मिळेल. कोर्ट केस यशस्वी होईल. शिक्षणात प्रगती होईल. शोध मोहीम फत्ते कराल. शुभ दि. 7, 8

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -