घरलाईफस्टाईलदररोज एक अक्रोड खा!

दररोज एक अक्रोड खा!

Subscribe

जाणून घ्या अक्रोड खाण्याचे फायदे

बऱ्याचदा ड्रायफ्रुट्समध्ये असलेले बदाम, काजू, बेदाणे आणि पिस्ता याचे सेवन केले जाते. मात्र, या ड्रायफ्रुट्समध्ये असणारे अक्रोड हे फोडून खाण्यास फार कंटाळा केला जातो. त्यामुळे ते खाल्ले जात नाही. परंतु, अक्रोडमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळतात. तसेच त्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी फार मदत करते. त्याचप्रमाणे अक्रोडला ब्रेन फूड म्हणून देखील बोले जाते. चला तर जाणून घेऊया या अक्रोडचे अजून किती फायदे आहेत ते.

टेन्शन दूर पळते

- Advertisement -

अक्रोड खाल्ल्याने टेन्शन राहत नाही. तसेच तणाव दूर होण्यास मदत होते. त्यामुळे दररोज एक अक्रोड खाल्ल्यास त्याचा अधिक फायदा होतो.

सफेद डागांची समस्या

- Advertisement -

दररोज अक्रोड खाल्याने शरीरावर होणाऱ्या सफेद डागांची समस्या दूर होते.

झोपेसाठी परिणामकारक

डाएटमध्ये दररोज ५ अक्रोड आणि १५ ते २० मनुकांचा समावेश केला तर अनिद्रेची समस्या दूर होते. तसेच अक्रोडमध्ये मेलाटोनिन आढळून येते जे झोपेसाठी परिणामकारक ठरते.

लिव्हर संबंधित समस्या

अक्रोड लिव्हर संबंधित समस्या, थायरॉइड, सांधे दुखी तसेच पिंपल्स, डायबेटीज यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी मदत करते.

हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत

अक्रोडमध्ये ओमेगा – ३ फॅटी अॅसिड असते. त्यामुळे त्याचे सेवन करणे हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी मदत करते.

ब्रेस्ट कॅन्सर

अक्रोडमध्ये कॅन्सररोधी गुणधर्म असतात. त्यामध्ये अॅन्टी – ऑक्सिडंट असतात. जे कॅन्सर वाढण्यापासून रोखतात. तसेच ब्रेस्ट कॅन्सर रोखण्यासाठीही अक्रोड लाभदायक ठरते.

वजन कमी होते

अक्रोड रक्तातील कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी ठेवण्याचे काम करते. तसेच पचनासाठीही मदत करते. त्यासोबतच पोटाच्या समस्यांवरही अक्रोड फायदेशीर ठरते. एका दिवसामध्ये २ ते ३ अक्रोड खाल्याने वजन कमी होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -