घरलाईफस्टाईलशतपावलीचे फायदे

शतपावलीचे फायदे

Subscribe

दिवसभर थकूनभागून कामावरून घरी आल्यावर रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपी जाण्याची सवय अनेक आजारांना निमंत्रण देवू शकते. ऑफीसमधील १० ते १२ तास काम करणे, धकाधकीचे जीवन यामुळे अनेकांना व्यायाम करण्यास वेळ मिळत नाही. त्यातच जेवणानंतर लगेच झोपी गेल्याने पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे रोज रात्री जेवल्यानंतर कमीत कमी १० ते १५ मिनीटे मोकळ्या हवेत चालावे म्हणजेच शतपावली करावी. असे केल्याने अनेक आजारांना आपण दूर ठेवू शकतो.

रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपी गेल्याने पित्त, अपचनाचा त्रास होवू शकतो. त्यामुळे रात्री जेवल्यानंतर किमान १५ मिनीटे मोकळ्या हवेत चाला. असे केल्याने पचनसंस्था सुरळीत कार्य करते. शिवाय पित्ताचा त्रास होत नाही.

- Advertisement -

चालणे हा एक उत्तम व्यायाम असून, रात्रीच्या जेवणानंतर शतपावली केल्याने वजन आटोक्यात राहण्यास मदत होते. नियमित चालल्याने अनावश्यक कॅलरीज बर्न होतात. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.

शरीराचे वजन आटोक्यात ठेवण्यासाठी तुमचा मेटॅबॉलिझम रेट महत्त्वाची भूमिका पार पाडतो. तो सुधारण्यासाठी डाएट जशी प्रमुख भूमिका पार पाडते तसेच तुमचा व्यायामदेखील गरजेचा असतो. शरीराचे मेटॅबॉलिझम सुधारण्यासाठी चालणं आवश्यक आहे.

- Advertisement -

आजकाल अनेकांना निद्रानाशाची समस्या आहे. त्यावर मात करण्यासाठी औषध गोळ्यांऐवजी काही योगासन आणि चालण्याची सवय फायदेशीर ठरते. यामुळे रात्रीची शांत झोप येण्यास मदत येते. चालल्यामुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते.

जेवणानंतर रात्रीच्या वेळेस शतपावली करणे हा व्यायामाचा एक उत्तम भाग असू शकतो. यामुळे टाईप २ मधुमेह आटोक्यात राहतो. अचानक रक्तातील वाढणार्या साखरेचं प्रमाण आटोक्यात राहते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -