जाणून घ्या कापराच्या तेलाचे लाभदायी फायदे

जाणून घ्या कापराच्या तेलाचे लाभदायी फायदे

कापराचा वापर हा देवघरात केला जातो. मात्र, हा कापूर केवळ पूजेकरताच मर्यादित नसून या कापराच्या तेलाचे इतर देखील फायदे आहेत. कापूर जेवढा लाभदायक आहे तेवढेच कापराचं तेल देखील अधिक मूल्यवान आहे. चला तर जाणून घेऊया कापराच्या तेलाचे लाभदायी फायदे.

मुरूमांवर फायदेशीर

कापराच्या तेलाला त्वचेवर लावल्यानं गळू-पुटकळी आणि मुरूम बरे होऊ लागतात. हे मुरुमांना कमी करतंच, त्याशिवाय त्वचेवरील मुरुमांच्या डागाला देखील मुळातून काढून टाकतो.

पायाला पडणाऱ्या भेगा

एका टबमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात थोडंसं कापराचं तेल घाला. आता काही काळ त्यामध्ये आपले पाय बुडवून बसा. यामुळे आपल्या टाचा देखील स्वच्छ होतील आणि भेगा पडलेल्या टाचा देखील बऱ्या होतील.

केस वाढीसाठी

कापराचे तेल केसांमध्ये लावल्याने केस वेगाने वाढतात, बळकट होतात आणि गळणे थांबते. यासाठी कापराचं तेल दह्यात मिसळून केसांच्या मुळात लावावं आणि एक तासानंतर केस धुवावं.

डाग पुसट होतात

त्वचेवर जळण्याचे किंवा जखमेचे डाग असल्यास कापराचं तेल त्या जागी लावल्यानं डाग पुसट आणि फिकट होतात.

वेदनेपासून आराम मिळतो

अंतर्गत वेदनेमध्ये देखील कापराचं तेल खूप प्रभावी आहे. शरीराच्या कोणत्याही भागात वेदना होत असल्यास कापराचं हे तेल कोमट करून त्या जागी चोळल्यानं वेदनेपासून आराम मिळतो.