छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख आता लंडनमध्ये

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महारांजाचे पोशाख पुण्यातील मराठमोळ्या युवक दिपक माने हे शिवाजी महाराजांचा पोशाख शिवजातस्य नावाने शाही लग्नासाठी सादर करीत आहेत, तेही महाराष्ट्रात नव्हे तर लंडनमध्ये.

Pune,Maharashtra
traditional day
शिवजातस्य कलेक्शन

भारतात राजेशाही लग्न करण्याची क्रेज सध्या चालू आहे. शाही लग्नात राजे महाराजांसारखे पोशाख परिधान केले जातात. ज्यामध्ये देशातील विविध राजांच्या पोशाखाचे अवलंब केले जातात. परंतू आजतागायत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महारांजाचे पोशाख वापरण्यात आले नाही. त्यामुळे पुण्यातील मराठमोळ्या युवक दिपक माने हे शिवाजी महाराजांचा पोशाख शिवजातस्य नावाने शाही लग्नासाठी सादर करीत आहेत, तेही महाराष्ट्रात नव्हे तर लंडनमध्ये. पुणेकर कुठल्याही क्षेत्रात मागे नसतात. आपली छाप देशविदेशात प्रत्येक क्षेत्रात सोडतात. मग ते फॅशनमध्ये कसे मागे राहतील. हाच उद्देश समोर ठेवून काहीतरी वेगळं करण्याच्या मनसुब्याने आणि शिवाजी महाराजांच्या आचार तसेच विचाराने प्रेरित होऊन शिवजातस्य या नावाने शाही पोशाखाला आधुनिकतेची जोड देत त्यांनी शिवजातस्य बनवले आहे.

महाराजांचा इतिहास परदेशातही

शिवजातस्य या शिवाजी महारांच्या शाही पोशाखमध्ये आभूषण, वस्त्र, मुजडी, पगडी आदींचा समावेश आहे. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार तसेच सिंहासन आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचा इतिहास पोशाखाच्या माध्यमातून पोहचविण्याचा प्रयत्न दिपक माने याने केला आहे. तसेच हे पोशाख आजच्या फॅशनला अनुसरुन सादर करण्याचा ध्येय त्याने घेतला आहे.

मी महाराष्ट्रीयन असल्याचा मला अभिमान आहे. महाराष्ट्रीयन असल्यानेच आपली संस्कृती आणि महाराजांचा इतिहास जगभर पोहंचविण्याच्या उद्देशानेच या प्रकारचा पोशाख बनविण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांचा पोशाख आधुनिक युगाशी ताळमेळ जोडत आम्ही शिवजातस्य कलेक्शन सादर करीत आहे. सर्व स्तरातून याचे स्वागत केले जाईल याची मला खात्री आहे.
– दिपक माने, ड्रेस डिजायनर, पुणे

इंडिया फॅशनविक ऑलम्पियामध्ये सहभाग

लंडनमध्ये इंडिया फॅशनविक ऑलम्पिया ११ नोव्हेंबरला होत असून या ठिकणा संपूर्ण भारतातून अनेक डिजाइनर्स आपापले कलेक्शन सादर करतील. या फॅशन शोमध्ये शिवाजी महाराजांचा पोशाख आजच्या फॅशनला ताळमेळ घालत तसेच त्यांनी परिधान केलेले दागिनेही यावेळी सादर करण्यात येणार आहे. या फॅशनविकसाठी पुण्यातून २५ मॉडेल जाणार असून त्या महाराष्ट्राच्या संस्कृतीसह शाही पोशाख सोबत आभूषणं सादर करणार आहे. याद्वारे छत्रपती महाराजांचे पोशाख सादर करणारे दिपक माने हे देशातील प्रथम व्यक्ती मानले जात आहेत. शाही लग्नात नवरा-नवरीसाठी शाही पोशाख सादर करणार आहेत.

यासाठी तब्बल २ वर्ष संशोधन केले 

छत्रपती शिवाजींचा पोशाख बनविण्यासाठी माने यांनी तब्बल २ वर्ष संशोधन केले. यासाठी त्यांनी २०-२५ किल्ले पिंजून काढले. यासाठी त्यांच्या ३४ जणांच्या टीमने मेहनत घेतली. दिपक माने हे राजा महाराजांचे कपडे, आभूषणं, फेटा, पगडी, बुट, चप्पल सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी काम करीत आहेत. शाही लग्नासाठी सर्व काही एकाच छताखाली मिळावे यादृष्टीने त्यांनी तशी उपाययोजना केली आहे. येथे शाही पोशाख, आभूषणं, डोली सर्वकाही याच ठिकाणी मिळणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here