घरलाईफस्टाईलनारळाचे मोदक

नारळाचे मोदक

Subscribe

जाणून घ्या नारळाच्या मोदकाची रेसिपी

लाडक्या बाप्पाचा आवडता नैवद्य म्हणजे मोदक…त्यामुळे बाप्पा घरी आल्यानंतर घरा घरात खमंग सुटतो तो म्हणजे उकडीच्या मोदकाचा. मात्र, आज आपण उकडीच्या मोदकाची रेसिपी न पाहता झटपट असे बनवता येणाऱ्या नारळाच्या मोदकाची रेसिपी पाहणार आहोत.

- Advertisement -

साहित्य 

  • किसलेला नारळ
  • पाऊण डबा कन्डेन्स् मिल्क
  • चमचे गुलाब पाणी
  • वाटी चॉकलेट
  • चमचा तुप

कृती 

प्रथम एका भाड्यात नारळ घ्या. त्यात पाऊण डबा कन्डेन्स् मिल्क टाका. त्यानंतर चमचे गुलाब पाणी टाकून घ्या. हे सर्व मिश्रण एकत्रित करुन घ्या. त्यानंतर मोदकाच्या साच्याला तुप लावा आणि साच्यामध्ये तयार मिश्रण भरुन मोदक तयार करुन घ्या. त्यानंतर चॉकलेट वितळवुन घ्या आणि वितळलेल्या चॉकलेटमध्ये तयार केलेल्या मोदकाचा अर्धा भाग बुडवा आणि फ्रिजमध्ये २० मिनिटे सेट होण्यासाठी ठेवा. अशाप्रकारे तुमचे झटपट नारळाचे मोदक तयार.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -