घरलाईफस्टाईलनिरोगी केसांसाठी रामबाण कढीपत्ता

निरोगी केसांसाठी रामबाण कढीपत्ता

Subscribe

दह्याची कढी, विविध प्रकारची चटणी, तसेच इतर भारतीय पदार्थांमध्ये आवर्जून वापरण्यात येणार्‍या कढीपत्त्याचे औषधी गुणधर्म चकीत करणारेच आहेत. त्यामुळे जाणून घेऊयात स्वयंपाकघरातील या रामबाण औषधाविषयी…

निरोगी, घनदाट केसांसाठी – कढीपत्त्यात व्हिटॅमिन बी १, बी ३, बी ९ आणि सी असतात. याशिवाय आयरन, कॅल्शियम आणि फॉस्फोरस आढळते. गरजेपेक्षा जास्त केमिकलचा वापर आणि प्रदूषणामुळे केसांचे नुकसान होते. कढीपत्त्यात अशी सर्व पोषकतत्त्वे आहेत, जे केसांना निरोगी ठेवतात. कढीपत्त्याच्या पानांना बारीक करून त्याचा लेप बनवावा. मग तो लेप केसांच्या मुळाशी लावावा. यामुळे केस काळे, लांब आणि घनदाट होतात. सोबतच केसांची मूळे मजबूत होतात. कढीपत्त्याच्या पानांचे दररोज सेवन केल्याने आपले केस काळे, लांबसडक होतील, तसेच डँड्रफ म्हणजेच कोंड्याची समस्याही दूर होईल.

- Advertisement -

केसांसाठी मास्क – कढीपत्त्याची पाने बारीक करून पेस्ट बनवा. त्यात थोडे दही घालून केसांना लावा. आता केस २०-२५ मिनिटे तसेच ठेवा, नंतर शॅम्पूने केस धुवा. असे नेहमी केल्याने केस काळे आणि घनदाट होतात.

कढीपत्त्याचे तेल – कढीपत्ता वाळवून घ्यावा. वाळल्यानंतर पानांची पावडर तयार करून घ्यावी. आता २०० मिमी खोबरेल तेलात जवळपास ४ ते ५ चमचे कढीपत्त्याची पावडर मिक्स करून उकळून घ्यावी. चांगल्या उकळीनंतर ते थंड होऊ द्यावे. मग तेल गाळून एका हवाबंद बॉटलमध्ये टाकावे. झोपण्यापूर्वी दररोज हे तेल लावावे. जर तेल थोडे कोमट करून लावले तर अधिक फायदेशीर ठरते. दुसर्‍या दिवशी केस धुवावेत. चांगला फायदा होईल.

- Advertisement -

कढीपत्त्याची चहा – कढीपत्ता पाण्यात उकळून घ्या. यात लिंबू पिळा आणि साखर घाला. असा चहा बनवून एक आठवडा प्यावा. हा चहा आपल्या केसांना लांब, घनदाट बनवेल. त्याचबरोबर केस पांढरे होण्याची समस्याही दूर होईल.

कढीपत्त्याचे इतर उपयोग

* कढीपत्ता पचनास चांगली मदत करतो. ज्यांना अजीर्णाचा सारखा त्रास होतो, जेवल्यावर अस्वस्थ वाटते, पोटात गॅस पकडतो, त्यांनी जेवल्यावर कढीपत्त्याची दहा पाने चटणी करून सैंधव मीठ मिसळून खावीत.

* मधुमेही रुग्णांनी कढीपत्त्याची दहा-बारा कच्ची पाने दिवसातून तीनदा चावून खावीत. याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित रहायला फार मदत होते.

* सर्दी-खोकल्यासारखे आजार सारखे होत असतील, तर अशा लोकांनी सकाळी अनशापोटी कढीपत्त्याची पंधरा पाने चावून खावीत.

* कढीपत्त्याच्या नियमित सेवनाने डोळ्यांचे विकार कमी होतात.

* कोणत्याही प्रकारच्या काविळीत कढीपत्ता चावून खाणे म्हणजे अगदी साधा घरगुती उपाय आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -