घरलाईफस्टाईलअशी करा भांड्यांची स्वच्छता.....

अशी करा भांड्यांची स्वच्छता…..

Subscribe

वेग-वेगळ्या धातूच्या भांड्यांची स्वच्छता करण्याची पद्धतही वेगवेगळी असते. धातूच्या प्रकारानुसार भांड्यांची स्वच्छता केल्यास ते भांडे जास्त काळ टिकते. चला तर जाणून घेऊ या विविध प्रकारच्या भांड्यांची स्वच्छता कशी राखायची ते.

पितळेची भांडी-

राख आणि नारळाची साल रगडून स्वच्छ करा आणि पाण्याने धुवा. या भांड्यांवर पडलेले डाग धुण्यासाठी चिंचेचे पाणी किंवा लिंबाचे पाणी वापरू शकता. तसेच व्हिनेगर आणि मीठ वापरल्यानेसुद्धा त्यावरील डाग नाहीसे होतील.

अ‍ॅल्युमिनियमची भांडी –

या भांड्यांवर पडलेले डाग काढण्यासाठी त्यावर मीठ चोळा. ही भांडी साबणाने धुतल्यानंतर व्हिनेगरने धुतल्याने ती चमकतात.

- Advertisement -

चांदीची भांडी-

चांदीचा भांडी रिठ्याने घासल्यास किंवा रिठ्याच्या पाण्याने धुतल्यास चकचकचित होतात. ही भांडी ताक किंवा चिंचेच्या पाण्याने देखील स्वच्छ करता येतात. तसेच उकडलेल्या बटाट्याच्या पाण्याने देखील तुम्ही ती स्वच्छ करू शकता.

काचेची किंवा चीनी मातीची भांडी-

काचेची भांडी गरम पाण्यात चुना मिसळून धुतल्यास चकचकित होतात. तसेच काचेच्या ग्लासमध्ये थोडा सोडा आणि व्हिनेगर टाकून धुतल्यास ते चांगले स्वच्छ होते.ही भांडी साबणाने देखील स्वच्छ होतात.
चीनी मातीची भांडी स्वच्छ करताना अमोनिया पाण्यात मिसळून वापरल्याने चांगली स्वच्छ होतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -