उपवास रेसिपी : ‘इडली’

उपवासाची 'इडली' रेसिपी

fast special recipe fasting Idli recipe
उपवास रेसिपी : 'इडली'

आठवड्यामध्ये बऱ्याच मंडळींचा एक दिवसाचा तरी उपवास असतो. मात्र, दर आठवड्याला उपवासाकरता काय करावे, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यांच्याकरता खास अशी चविष्ट अशी उपवासाची रेसिपी घेऊन आलो आहोत ती म्हणजे उपवासाची ‘इडली’

साहित्य

दीड वाटी भगर
अर्धी वाटी साबुदाणा
एक वाटी दही
चिमूभर मीठ आणि खाण्याचा सोडा

कृती

सर्वप्रथम भगर आणि साबुदाण वेगवेगळे भाजून घ्यावेत. त्यानंतर साबुदाणा मिक्सकरवर रवाळ बारीक करुन घेणे. मग दोन्ही साहित्य दह्यामध्ये भिजवून जोन तास तसेच भिजत ठेवणे. मग त्यात थोडा खाण्याचा सोडा आणि चवीप्रमाणे मीठ घालून नेहमीप्रमाणे इडली करणे.