आई म्हणजे आई असते! तीने स्वत:चं ४२ लीटर दूध केलं अनाथांना दान

filmmaker nidhi donated 42 ltr breast milk during lockdown

चित्रपट निर्मात्या निधी परमार हिरानंदानी यांनी लॉकडाऊन काळात स्वत:चे ४२ लीटर दूध दान केले आहे. ४२ वर्षीय निधी परमार हिरानंदानीने काही दिवसांपूर्वी बाळाला जन्म दिला. तिच्याजवळ जास्त ब्रेस्ट मिल्क असल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर तिने तिच्या कुटुंबाला आणि मित्रांना याची माहिती दिली. नातेवाईकांनी अनेक सल्ले दिले. मात्र, त्यांना एकही सल्ला पटला नाही. अखेर तिने स्वत:चे दूध दान करण्याचे ठरवले.

त्यांनी इंटरनेटवर आपल्या समस्येवर उपाय शोधला, तेव्हा त्यांना लक्षात आले की अमेरिकेत ब्रेस्ट मिल्क डोनेट केले जाते. त्यानंतर त्याने आपल्या परिसरात देणगी केंद्रे शोधण्यास सुरवात केली. निधीच्या स्त्रीरोगतज्ज्ञांनी तिला मुंबईतील रूग्णालयाबद्दल सांगितले जे गेल्या एका वर्षापासून ब्रेस्ट मिल्क बँक सुरु केली आहे. तिथे तिने दूध डोनेट करायचे ठरवले. निधी दान देण्यापूर्वीच संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू होते, परंतु कोणताही संपर्क न होता त्यांच्या घरी येऊन दूध कलेक्ट करु असे रुग्णालयाने त्यांना आश्वासन दिले. या वर्षाच्या मेपासून हिरानंदानी यांनी सूर्य रुग्णालयाच्या नवजात इंटेंसिव्ह केअर यूनिटमध्ये ४२ लीटर स्तन दुध दान केले आहे.

व्हॉईस इंडियाशी बोलताना निधीने सांगितले की, काही दिवसांपूर्वीच मी रुग्णालयात गेले होते. मला पाहायचे होते की मी दान केलेल्या दूधाचा कसा वापर केला जात आहे. मी पाहिले की ६० अशी मुले होती ज्यांना दूधाची गरज होती. त्यानंतर मी आता असा निर्णय घेतला आहे की, पुढील एक वर्ष दूध दान करण्याचा प्रयत्न करणार आहे. निधी असेही म्हणाली की आपल्या समाजात आईच्या दूधाबद्दल कोणतीही खुलेआम चर्चा होत नाही.