केसांना बळकटी आणण्यासाठी आहारात करा ‘हे’ सामील

केसांच्या सौंदर्याकरता करा या गोष्टी

food for strong and beautiful hair
केसांना बळकटी आणण्यासाठी आहारात करा 'हे' सामील

केसांचे सौंदर्य टिकवण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न केले जातात. याकरता अनेक महागडी उत्पादने देखील खरेदी केली जातात. त्यासोबतच हेयर स्पा, तेल मालीश किंवा इतर सौंदर्य प्रसाधनांचा वापर देखील केला जातो. पण, काही आहार असे आहेत जे केसांच्या सौंदर्याला आणि मजबूती परत आणू शकतात आणि ते देखील कोणताही त्रास न घेता.

गाजर

शरीरासाठी गाजर फार महत्त्वाचे आहे. डोळ्यांच्या त्रासाकरता गाजर खाण्याचा सल्ला देखील दिला जातो. याशिवाय गाजराचे सेवन केल्यास सौंदर्य आणि आरोग्य देखील उत्तम राहते. यामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळतं. यामुळे केस सुंदर होण्यास मदत होते.

पालक

पालक हे आरोग्यासाठी एक उत्तम उपाय आहे. बऱ्याचदा केस गळती होते. अशावेळी पालकाचे सेवन केल्यास केस गळती थांबते. आयरनने समृद्ध असल्यामुळे याच्या सेवनाने आपल्या केसांच्या समस्ये पासून मुक्ती मिळते.

रताळे

रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळते. जे आपल्या केसांना बळकट करून गळण्यापासून रोखते. तसेच मुळांमध्ये असलेले तेल देखील सुरक्षित ठेवत, ज्यामुळे आपल्या केसांना पोषण मिळते.

दही

दही खाल्ल्याने केसांची गळती थांबते आणि यामुळे केस सुंदर आणि चमकदार बनतात. यामध्ये व्हिटॅमिन बी ६ आणि व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात आढळते. जे आपल्या केसांना नवं चैतन्य देते.

किशमिश

किशमिश खाल्ल्याने आपल्या केसांची वाढ वेगाने होते. यामध्ये लोह असण्यासह खनिजे देखील मुबलक प्रमाणात असतात. जे आपल्या केसांना पोषण देतात.