Saturday, January 16, 2021
27 C
Mumbai
घर लाईफस्टाईल हिवाळ्यात थंडीपासून वाचण्यासाठी डाएटमध्ये करा या गोष्टींचा समावेश

हिवाळ्यात थंडीपासून वाचण्यासाठी डाएटमध्ये करा या गोष्टींचा समावेश

थंडीच शरीरामध्ये उष्णता टिकवून ठेवण्यासाठी करा गरम पदार्थांचे सेवन

Related Story

- Advertisement -

थंडीच्या दिवसांना आता सुरूवात झाली आहे. त्यामुळे आरोग्याकडे विशेष लक्ष देणं गरजेच आहे. थंडीमध्ये ताप, सर्दी, खोकला इत्यादी आजार डोकं वर काढतात.  मात्र, हे साधे वाटणारे आजार आपल्याला हैराण करतात. थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण लोकरीचे उबदार कपडे परिधान करतो. परंतु उबदार कपड्यांबरोबरच शरीरामध्ये उष्णता टिकवून ठेवण्यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. शरीरीचे तापमान संतुलीत ठेवण्यासाठी व रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हेल्दी फूड खाणे आवश्यक आहे. कारण हेल्दी फूड थंडीच्या दिवसात रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करत असतात. थंडीत हेल्दी फूड म्हणजे चिकन, अंडी, मासे, व पालेभाजास फळे यांचा आहारात समावेश करा. हिवाळ्यात थंडीपासून वाचण्यासाठी डाइटमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असावा हे जाणून घेऊया.

थंडीत हेल्दी राहण्यासाठी उपयोगी ठरणारे पदार्थ  

चहा

tea

- Advertisement -

हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी मसाले चहा किंवा साधा चहा शरीरास फायदेशीर ठरत आहे. तसेच आले घालून  केलेला चहा शरीरात उष्णता निर्माण करण्यास अधिक उपयुक्त मानला जातो. आले घालून केलेला चहा सर्दी, खोकला, घशाला होणारा त्रास यावर रामबाण उपाय आहे.

 

दालचिनी

- Advertisement -

cinnamon

गरम मसाल्यांमध्ये दालचिनीचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. दालचिनी उष्ण, पाचक, कफनाशक गुणधर्माची आहे. मनाची अस्वस्थता कमी करण्यासाठी तसेच यकृताचे कार्य सुधारण्यास दालचिनी गुणकारी आहे. त्यामुळे हिवाळ्यात शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी चहामध्ये दालचिनीचा वापर करत सेवन करु शकता.

 

दही

curd

थंडीच्या दिवसात प्रमाणात दही खाणे फायदेशीर ठरु शकते, कारण दह्यामध्ये व्हीटामिन सी आणि फायबर यांसारखे पोषक घटक असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास हे घटक मदत करतात. परंतु थंडीत दह्यामुळे सर्दीचा धोका असल्याचं सांगितलं जात. पण सकाळ आणि रात्री न खाता दुपारी दही खाल्ल तर फायदेशीर ठरु शकते.

हळद

Turmeric

हळदीच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. हळद सर्दी, पडसे, खोकला आणि ताप प्रतिबंधित करते. तसेच, हळदीत भरपूर प्रमाणात आढळणारे अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे हळद पाचनक्रिया सुधारण्यास, रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, रक्ताचे शुद्धीकरण आणि कर्करोगासारख्या आजारांविरुद्ध लढण्यास प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.


हेही वाचा- थंडीत वाढतो केसात कोंडा; अशी घ्या काळजी

- Advertisement -