बाप्पासाठी खास मोदक

मोदक रेसिपी

Mumbai
ganesh chaturthi utsav ganpati seven types of modaks to try this festive season
गोडाचे खास मोदक

सर्वांच्या लाडक्या बाप्पाचा आवडता नैवद्य म्हणजे मोदक…त्यामुळे बाप्पा घरी आल्यानंतर घरा घरात खमंग सुटतो तो म्हणजे उकडीच्या मोदकाचा. मात्र, दरवर्षी उकडीचे मोदक असल्यामुळे काहीतरी वेगळे गोडाचे पदार्थ करावेस वाटतात. परंतु, बाप्पाला मोदक आवडत असल्यामुळे मोदक करावे लागतात. त्यामुळे आपण यंदा बाप्पाकरता खास विविध प्रकारच्या मोदकांच्या रेसिपी पाहणार आहोत.

पनीर मोदक

पनीरचे पदार्थ प्रत्येकाला आवडतात आणि त्यात जक पनीरचा मोदक असेल तर कोणाचाही तोंडाला पाणी सुटेल. दिल्लीमध्ये पनीरचे मोदक बनवले जातात. पनीर मोदकासाठी पनीरमध्ये साखर, काजू, किसमिस, वेलची पावडर एकत्र करुण सारण करावे. हे सारण रवा किंवा मैद्याच्या पोळीमध्ये भरुन तळून काढावे.

तिळगुळाचे मोदक

आतापर्यंत आपण तुळगुळाची चिक्की आणि लाडू खाल्ले आहेत. मात्र, आपण तिळगुळाचे मोदक देखील तयार करु शकतो. यवतमाळ भागात तिळी चतुर्थीला याचा नैवेद्य दाखवतात. गुळाचा पाक तयार करुन त्यात भाजलेले तीळ घालावे. हे सारण कणकेच्या सारीमध्ये भरुन मंद आचेवर तळावे. अजून एक पद्धत म्हणजे तीळ आमि गुळाचे सारण गरम असतानाच मोदकाच्या साच्यामध्ये टाकून मोदक करुन घ्यावेत.

बेसनाचे मोदक

बेसनाच्या पिठात अंदाजे तूप टाकून ते भाजून घ्यावे. लाडू बनवण्यासाठी बेसनाचे सारण मोदकाच्या साच्यात घालून मोदक बनवून घ्यावा.

केळीचे मोदक

केळी, ओले खोबरे, दुध, गुळ या मिश्रणाचे मिक्सरमधून पेस्ट करुन घ्यावी. पेस्टमध्ये थोडी वेलची पावडर आणि भाजलेला रवा घालावा. पेस्ट थोडी पिठासारखी झाली की त्याला मोदकाचा आकार देऊन तळून घ्यावा.

फ्रुट मोदक

गणपतीच्या दिवसांत भरपूर फळे येतात. वेगवेगळी फळे मिक्स फ्रुट जॅममध्ये मिसळून हे सारण मैद्याच्या पारीमध्ये भरून मंद आचेवर तळून घ्यावे.