घरलाईफस्टाईलवजन कमी करण्यासाठी करा अग्निसार क्रिया

वजन कमी करण्यासाठी करा अग्निसार क्रिया

Subscribe

अग्निसार क्रिया करण्याचे फायदे

बऱ्याचदा वजन वाढले की योगा, प्राणायम करण्याचा सल्ला दिला जातो. कारण प्राणायम केल्याने आरोग्यास त्याचा चांगला फायदा होतो. त्यातील असे काही प्राणायम आहेत. ज्यामुळे आपल्या काही समस्या असतील तर सहज दूर होतात. त्यातील एक प्राणायम म्हणजे अग्निसार क्रिया. हा प्राणायमाचा एक प्रकार आहे. हे प्राणायम नियमित केल्याने नाभीच्या भागावर सार्वधित परिणाम होतो. यामुळे आपली पचनक्रिया आणि विविध रोगांपासून देखील बचाव होतो. यामुळे पोटाची चरबी देखील कमी होते आणि वजनही कमी होते.

अग्निसार करण्याची पद्धत

- Advertisement -

पहिली सुखासनमध्ये बसा. आपले दोन्ही हात आपल्या गुडघ्यावर ठेवा आणि पाठीचा कणा, मान आणि डोके सरळ ठेवा. नंतर तोंडातून खोल श्वासोच्छ्वास बाहेर टाकत पोट आतल्या बाजूला ओढा. आता शक्य तितका श्वास थांबवा आणि पोट बाहेर आत ओढा. आपले लक्ष नाभीवर केंद्रित करा. २० ते ४० वेळेस असे करा. पुन्हा सामान्य स्थितीत या. श्वास सामान्य झाल्यानंतर ही क्रिया दोन ते तीन वेळा पुन्हा करा. ही क्रिया बसून केल्यास अति उत्तम.

अग्निसार क्रिया करण्याचे फायदे

  • अग्निसार क्रिया केल्याने पोटातील पोटदुखी, बद्धकोष्ठता दूर होते.
  • ही क्रिया केल्याने हानिकारक पदार्थ शरीरातून बाहेर जातात आणि त्वचा निरोगी राहते. त्यासोबतच आपले सौंदर्य वाढविण्यास ही मदत होते.
  • अन्न पचन करून पचनक्रिया चांगली ठेवते. त्यासोबतच यकृत, आतडे, मूत्रपिंड आणि स्वादुपिंड सक्रिय होतात.
  • हे प्राणायाम दररोज करावे यामुळे पोटावरील चरबी कमी होते. तसेच वजनही कमी करण्यास मदत होते.
  • हे प्राणायाम केल्याने शरीरातील रक्त देखील शुद्ध होते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -