घरलाईफस्टाईललग्नसमारंभाला जाताना...

लग्नसमारंभाला जाताना…

Subscribe

भारतीय संस्कृतीत विवाहसोहळा कौतुकाचा सोहळा ठरतो. या सोहळ्यात वधू-वर केंद्रस्थानी असले तरी लग्नाला जमलेली मित्रमंडळी, आप्तेष्ट वर्गाच्या पोशाख, पेहरावाची चर्चा होते. लहान, थोर, महिला-पुरुष सर्वच जण लग्नसमारंभाला जाताना वेषभूषेपासून केशभूषेपर्यंत सर्वच बाबतीत काटेकोरपणा जपतो. लग्नसोहळ्यात विविध विधींना वेगवेगळा पेहराव करण्याची क्रेझ सध्या लग्नसमारंभात दिसते.

लग्नसोहळ्यासाठी काही विशिष्ट ड्रेसकोड जरी नसला, तरी बहुतेक मंडळी पारंपरिक वेशभूषेची निवड करतात. मुली किंवा महिला या साडी, लेहेंगा किंवा पंजाबी सूट, अनारकली सूट यांसारखी वेशभूषा, तर पुरुषमंडळी चुडीदार-कुर्ता ,फॉर्मल सूट किंवा शेरवानी घालणे अधिक पसंत करतात. आपण निवडलेला पेहराव अगदी फार भरजरी नसला तरी सुंदर प्रसाधन आणि आकर्षक पण मोजक्याच दागिन्यांच्या जोडीने संपूर्ण वेशभूषा अतिशय सुंदर दिसते. त्याबद्दल थोडेसे.

- Advertisement -

दागिन्यांची निवड करताना
लग्नासाठी जाताना आपल्या पेहरावाबरोबर घालायच्या दागिन्यांची निवड काळजीपूर्वक करावी. आपल्याला हाती सापडतील ते सगळे दागिने एकदम घालण्याचा मोह आवर्जून टाळायला हवा. आपल्या पेहरावाला कॉम्प्लिमेंट करतील असे मोजकेच दागिने असावेत.

पेहरावासाठी निरनिराळ्या रंगांचा विचार
लग्नाला जाताना घालण्याच्या पेहरावांची रंगसंगती विचारपूर्वक निवडावी. लग्नसोहळ्यामधे काळ्या रंगाचा पेहराव सहसा टाळला जातो. लाल, मरून, हिरवा, पिवळा हे रंग जास्त पसंत केले जातात. गडद रंगांप्रमाणे पेस्टल रंगांच्या पेहरावांनासुद्धा महिलावर्गाची पसंती मिळत आहे. त्यामुळे आपल्या पेहरावासाठी निरनिराळे रंग विचारात घेणे चांगले.

- Advertisement -

पेहराव कॅरी करताना..
पेहराव भरजरी असो किंवा नसो, समारंभाच्या धावपळीत त्याची अडचण होणार नाही याकडे लक्ष द्यावे. विशेषतः उठता-बसताना, पायर्‍या चढताना आपला पेहराव पायात अडकणार नाही किंवा इतर कुठल्या वस्तूंमध्ये अडकणार नाही अश्या पद्धतीने परिधान केलेला असावा. त्याचप्रमाणे ऋतू आणि हवामान लक्षात घेऊन पेहरावाची निवड करावी.

एक्सेसरीजची निवडही महत्त्वाची
आपल्या पेहरावासोबत आपण घालणार असलेल्या एक्सेसरीजकडे विशेष लक्ष असावे. एक्सेसरीज म्हणजे केवळ दागिने असा नसून आपण सोबत घेणार असलेली पर्स किंवा क्लच, पादत्राणे यांच्या बाबतीतली निवड, ती लक्षपूर्वक करावी.

वॉटरप्रूफ प्रसाधने निवडावी
विवाहसोहळ्यासारख्या प्रसंगासाठी तयार होत असताना मेकअप आणि केशभूषा सुद्धा आपल्या पेहरावाला साजेसे हवेत. आजकाल बाजारामध्ये उत्तमोत्तम ब्रँड्सची प्रसाधने सहज उपलब्ध आहेत. त्यामध्ये, जास्त काळ चेहर्‍यावर टिकून राहणारी, वॉटरप्रूफ प्रसाधने वापरल्यास पुन्हा पुन्हा टच-अप करण्याचा त्रास वाचतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -