घरलाईफस्टाईलबाप्पाला प्रिय असणाऱ्या दुर्वा 'आरोग्यदायी'

बाप्पाला प्रिय असणाऱ्या दुर्वा ‘आरोग्यदायी’

Subscribe

आरोग्यदायी दुर्वा

गणांचा अधिपती म्हणजे गणपती. हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्वच कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा केली जाते. तसेच गणपती बाप्पाला दुर्वा आवडत असल्यामुळे बाप्पाला दुर्वांची जुडी वाहतात. यामुळे गणपती प्रसन्न होतो, असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे गणपतीला एकवीस दुर्वांची मिळून केलेली जुडी अर्पण देखील केली जाते. तसेच बाप्पाला प्रिया असणारा दुर्वा तितकाच औषधी देखील आहे. चला तर जाणून घेऊया दुर्वाचे आरोग्यदायी फायदे.

रक्तातील साखरेचे प्रमाण राखते

- Advertisement -

दुर्वामध्ये ‘हायपोग्लायस्मिक इफेक्ट’ असतो. त्यामुळे मधूमेहींनी दुर्वाचा रस पिणे फायदेशीर ठरते. यामुळे मधूमेहातून वाढणार्‍या गुंतागुतीच्या समस्या कमी होतात.

रोगप्रतिकारशक्ती वाढते 

- Advertisement -

आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी तुम्हाला उत्तम रोगप्रतिकारशक्तीची साथ असणे गरजेचे आहे. दुर्वा शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्याचे काम करते. त्यामुळे अनेक आजारांपासून सक्षमपणे लढण्याची क्षमता वाढते.

मूळव्याध

दुर्वा दह्यासोबत घेतल्यास मूळव्याध तसेच अंगावरून पांढरे जाण्याची समस्या दूर होण्यास मदत होते.

पचन सुधारते

खाण्या-पिण्याच्या चूकीच्या सवयींमुळे आजकाल पचनाचे विकार वाढले आहेत. मात्र, नियमित दुर्वांचा रस प्यायल्यास पचनमार्गाचे कार्य सुधारते, पोट साफ राहण्यास मदत होते.

पित्ताचा त्रासही कमी होतो

नियमित दुर्वांचा रस घेतल्यास पित्ताचा त्रास कमी होतो आणि शरीर नैसर्गिकरित्या डीटॉक्स होते.

दात आणि तोंडाचे आरोग्य सुधारते

दुर्वांमध्ये ‘फ्लॅवोनाईड्स’ या अतिशय पोषक घटकांचा समावेश असतो. त्यामुळे अल्सरचा त्रास होण्याचा धोका कमी होतो. हिरड्या सुधारतात तसेच तोंडाला येणारी दुर्गंधीसुद्धा कमी होण्यास मदत होते.

त्वचेच्या आजारांपासून सुटका होते

खाज येणे, रॅश येणे अशा त्वचाविकारांवर दुर्वा उपयुक्त आहे. त्यातील दाहशामक आणि अ‍ॅन्टीसेप्टिक गुणधर्म असे आजार कमी करतात. यासाठी दुर्वाची पेस्ट हळदीत मिसळून त्वचेवर लावावी. कुष्ठरोगासारख्या गंभीर त्वचारोगामध्येदेखील हा नैसर्गिक उपाय फायदेशीर ठरतो.

रक्त शुद्ध करते

दुर्वा नैसर्गिकरित्या रक्त शुद्ध करते. तसेच त्यामध्ये अल्कॅनिटीचे संतुलन ठेवण्यास मदत करते. यामुळे इजा, जखम झाल्यास किंवा मासिकपाळीतही अतिरिक्त प्रमाणात रक्तप्रवाह होत नाही.

हृद्याचे आरोग्य सुधारते

दुर्वामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण आणि सोबतच कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाणही नियंत्रणात राहते. तसेच हृदयाचे कार्य सुधारते

शरीर फीट अ‍ॅन्ड फाईन ठेवते

दुर्वांचा रस प्यायल्याने तुम्हांला उर्जा मिळते. निद्रानाशाची समस्या दूर करण्यासाठी दुर्वा उपयुक्त आहे. तसेच दिवसभरातील थकवा दूर करण्यासाठी दुर्वा मदत करते. या रसामुळे शरीरातील थकवा दूर होण्यास मदत होते. तसेच मज्जासंस्थेवरील ताणही कमी होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -