घरलाईफस्टाईलअंजीराचे आरोग्यादायी फायदे

अंजीराचे आरोग्यादायी फायदे

Subscribe

जाणून घ्या अंजीराचे आरोग्यादायी फायदे

सध्याच्या धावपळीच्या जीवनात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला काहीना काही त्रास, दुखणे सतावत असते. अनेकदा चुकीच्या पद्धतीचा आहारात समावेश केल्याने तर काही वेळा अपुऱ्या झोपेमुळे कंबरेचे, पायाचे दुखणे सतावते. अशावेळी आरोग्यदायी सुके अंजीर खाल्याने दुखण्यांपासून आराम मिळतो.

अंजीरमध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात. अंजीरमध्ये पाणी ८०%, कॅल्शियम घटक ०.०६%, कार्बोहायड्रेट ६३%, फायबर २.%, प्रोटीन ३.%, क्षार ०.%, सोडियम, पोटॅशियम, तांबे, सल्फर आणि क्लोरिन घटकही मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे अंजीर हे आरोग्यदायी आहे.

- Advertisement -

हाडे मजबुत होतात

सुक्या अंजीरमध्ये कॅल्शियम घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे हाडं मजबूत होण्यास मदत होते.

गुडघे दुखी

गुडघ्याचं दुखणं कमी करण्यासाठी सुके अंजीर फायदेशीर आहे.

- Advertisement -

कोणतेही दुखणे

दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी नियमित ३४ अंजीराचे सेवन केल्याने फायदा होतो.

कंबरेचे दुखणं

कंबरेचे दुखणं असल्यास अंजीर, सुंठ आणि धणे समप्रमाणात मिसळून बारीक कुटून खावे. रात्री हे मिश्रण पाण्यात मिसळावे. सकाळी उठल्यावर हे पाणी गाळून प्यावे. नियमित हे मिश्रण प्यायल्यास त्रास कमी होण्यास मदत होते.

पोट साफ होण्यास मदत करते

अंजीरमध्ये तंतूमय पदार्थाचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो. तंतूमय पदार्थ पोट साफ करण्यास मदत करतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -