घरलाईफस्टाईलआरोग्यदायी पनीर

आरोग्यदायी पनीर

Subscribe

अनेक आरोग्यदायी पनीरचे फायदे आहेत ते जाणून घेऊ

चटपटीत पदार्थांमध्ये अनेकांची पसंती पनीरला असते. पनीरचे विवध पदार्थ तयार केले जातात. मांसहारी पदार्थ न खाणाऱ्या अनेक लोकांची पहिली पसंती पनीरच असते. पनीर प्रोटिनयुक्त असल्याने ते आरोग्यदायी आहे. असे म्हटले जाते की, व्यक्तीसाठी आवश्यक असलेले सर्व पोषक द्रव्ये दुधामध्ये आहेत. मात्र, तुम्हाला दूध आवडत नसेल तर पनीरपेक्षा उत्तम तुमच्यासाठी दुसरे काहीच असू शकत नाही. पनीर रूचकर लागतेच, पण हाडे आणि दातांच्या मजबुतीसाठी ते आवश्यक असते. यासोबतच अनेक आरोग्यदायी पनीरचे फायदे आहेत ते जाणून घेऊ…

- Advertisement -

 

दात आणि हाडे

पनीरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हाडे आणि दात मजबूत होतात. त्याचबरोबर कॅल्शिअम, फॉस्फरसचा उत्तम स्रोत म्हणजे पनीर. नियमित पनीरचे सेवन केल्यास हाडांच्या समस्या, सांधेदुखी आणि दंतरोग यांच्यापासून बचाव होतो.

- Advertisement -

फॅट्स बर्न होण्यास मदत होते

प्रोटिन आणि कॅल्शियमबरोबरच पनीरमध्ये कॉन्ज्युगेट लिनोलीक अॅसिड नामक फॅटी अॅसिड असते. यामुळे शरीरातील फॅट्स कमी होऊन वजन घटण्यास मदत होते. वजन कमी करायचे असल्यास आहारात पनीर असलेल्या पदार्थांचा समावेश करावा.

भुकेवर नियंत्रण राहते

पनीरमध्ये प्रोटिन्स असल्याने ऊर्जा हळूहळू वापरली जाते. यामुळे रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रित राहते. तसेच ती झटकन वाढून कमी देखील होत नाही. त्यामुळे पनीर असलेले पदार्थ खाल्याने बराच वेळ भुकेवर नियंत्रण राहते.

प्रोटिनचा सर्वोत्तम स्रोत

काही शाकाहारी लोक मांस खात नाहीत, त्यामुळे त्यांच्यासाठी पनीर हा प्रोटिन्स मिळवण्याचा चांगला स्रोत आहे. १०० ग्रॅम पनीरमधून १८ ग्रॅम प्रोटिन्स मिळतात. यामुळे स्नायू बळकट होतात आणि वजन कमी होण्यासही मदत होते.

मधुमेह

पनीरमध्ये ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड असते. त्यामुळे पनीर मधुमेहाशी अगदी प्रभावीपणे दोन हात करते. मधुमेही रुग्णांनी रोज आपल्या आहारात पनीर सेवन करावे, असा सल्ला डॉक्टर देतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पनीर दोन्ही प्रकारच्या मधुमेहासाठी प्रभावी ठरते.

त्वरित ऊर्जा

दुधापासून बनवलेले असल्याने पनीरमध्येही दुधाचे गुण येतातच. ऊर्जेचा उत्तम स्रोत म्हणजे पनीर. शरीराला त्वरित ऊर्जा मिळण्यासाठी पनीरचे सेवन करणे फायदेशीर असते. शरीरयष्टी संपादन करण्यासाठी व्यायाम करणार्‍यांनी पनीर सेवन केल्यास त्याचे विशेष फायदे होतात.

हृदय विकाराचा धोका कमी

कॅन्सर, हृदय विकार यांसारख्या गंभीर आजारांपासूनही पनीरमुळे संरक्षण होते. पनीर असलेले पदार्थ खाल्याने शरीरातील कॅन्सरच्या पेशींची वाढ खुंटते. याचबरोबर रक्तवाहिन्यांमध्ये फॅट्स जमा होण्याचे प्रमाणही कमी होते. यामुळे हृदय विकाराचा धोका कमी होतो.

कॅल्शियमचा स्रोत

पनीर कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. याच्या नियमित सेवनाने दात आणि हाडे मजबूत राहतात. यामध्ये लॅक्टोज खूप कमी प्रमाणात असते. त्यामुळे दातांना गोड पदार्थांपासून होणारा धोकाही राहत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -