घरलाईफस्टाईलतुमच्याही हाता-पायाला येतात मुंग्या? जाणून घ्या कारणे आणि उपाय

तुमच्याही हाता-पायाला येतात मुंग्या? जाणून घ्या कारणे आणि उपाय

Subscribe

हाता-पायाला मुंग्या का येतात आणि याचे नेमके उपाय काय आहेत?

बऱ्याचदा बसलेले असताना किंवा उभे असताना अचानक हाताला किंवा पायाला मुंग्या येतात. तर बऱ्याच जणांना झोपेत देखील हाताला मुंग्या येतात. मात्र, या मुंग्या का येतात आणि यावर नेमके उपाय काय आहेत? ते आज आपण पाहणार आहोत.

का येतात मुंग्या?

- Advertisement -

शरीराच्या हात, पाय आणि खांद्याला मुंग्या येणे ही एक सामान्य बाब आहे. याच कारण म्हणजे लेटताना, बसताना किंवा उभे राहताना शरीराच्या अंगांवर सर्वात जास्त प्रेशर पडते. ज्यावेळी तुम्ही एकाद्या पोजिशनमध्ये बराचवेळ काम करता किंवा एकाच पोजिशनमध्ये थांबले असता, मांसपेशी आणि रक्तवाहिन्या संथ होतात. त्यामुळे शरीराच्या काही भागांना मुंग्या येतात. जनरली जेव्हा रक्तप्रवाह थांबतो तेव्हा शरीराच्या काही अंगांना मुंग्या येतात.

यावरील उपाय?

- Advertisement -

लसूण आणि सूंठ

जर मुंग्या येण्याची समस्या दररोजची झाली असल्यास सकाळी उठल्यावर नैसर्गिक विधी झाल्यानंतर सूंठाचे काही तुकडे किंवा लसणाच्या दोन कळ्या चाऊन खाव्यात. याने तुम्हाला आराम मिळेल आणि रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होईल.

तूप

रात्री झोपण्यापूर्वी तूप थोडं कोमट करुन घ्या आणि ते तळपायाला लावा. तुम्हाला होत असलेली मुंग्या येण्याची समस्या दूर होईल.

पिंपळाची पाने

पिंपळाचे झाड हे गुणकारी मानले जाते. मुंग्या येण्याची समस्या सातत्याने होत असेल तर पिंपळाची ३-४ पाने मोहरीच्या तेलात उकळून घ्या. जेव्हा तुम्हाला मुंग्या येतील त्या जागेवर हे तेल लावा. आराम मिळेल.


हेही वाचा – अचानक ब्लड प्रेशर कमी झाल्यास ‘या’ पदार्थांचे करा सेवन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -