असे दूर करा लॉकडाऊनमधील नैराश्य

लॉकडाऊनमध्ये नैराश्य आले आहे. चिंता सोडा हे करा उपाय.

Mumbai
how to fight depression naturally
असे दूर करा लॉकडाऊनमधील नैराश्य

सध्या देशात लॉकडाऊन असल्यामुळे तब्बल दोन महिने घरात राहावे लागत आहे. त्यामुळे अनेकांना नैराश्य आले आहे. काय करावे हे देखील सुचत नाही. त्यामुळे आता तुम्ही काही काळजी करु नका. असे काही उपाय करा ज्यामुळे नैराश्य दूर होण्यास मदत होईल.

कामाकडे लक्ष द्या

बऱ्याचदा काहीच करायची इच्छा नसते. अशावेळी निराश न होता. आपले मन आणि लक्ष कामाकडे केंद्रित करा. कामाला प्राधान्य द्या.

मेडिटेशन करा

मेडिटेशन करुन आपल्याला कामाच्या तणावांपासून मुक्ती मिळेल. यासाठी तणावाच्या स्थितीमध्ये दीर्घ श्वास घ्या. यामुळे तणावापासून दूर राहतो आणि आरोग्य चांगले राहते.

गाणी ऐका

ताण तणाव दूर करण्यासाठी गाणी गाणे किंवा गाणी ऐकणे एक रामबाण उपाय आहे.

दुसऱ्यांशी संवाद साधा

अनेकदा नैराश आल्यामुळे एकटे राहावेसे वाटते. मात्र, मूड खराब असल्यास एकटे राहू नका. दुसऱ्यांशी गप्पा मारा आणि आनंदी रहा.

आवडते पदार्थ बनवा आणि खा

ताण असल्यास एखादा आवडता पदार्थ बनवा आणि त्या पदार्थाचे सेवन करा. यामुळे तुमचा मूड छान राहण्यास मदत होईल.


हेही वाचा –  लसूण सोलण्याच्या ५ हटके पद्धती