घरलाईफस्टाईलवाढते वजन दम्याला आमंत्रण - भाग २

वाढते वजन दम्याला आमंत्रण – भाग २

Subscribe

स्थूल व्यक्तींमध्ये दम्याचे प्रमाण अधिक

सडपातळ बांधा असलेल्या प्रौढांच्या तुलनेने स्थूल व्यक्तींमध्ये दम्याचे प्रमाण अधिक असते आणि स्थूलपणामुळे मुले व प्रौढांना दमा होण्याची शक्यता अनुक्रमे २.० ते २.३ पटीने वाढते. कॅनडियन रेस्पिटरेटरी जर्नलने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार स्थूलपणा असलेल्या व्यक्तींकडून, विशेषत: महिलांकडून दम्यावरील औषधे आणि स्वतःला दमा असल्याचे जाणवण्याचे प्रमाण अधिक असते. त्याचप्रमाणे लहानपणी होणार्‍या दम्यासाठी स्थूलपणा हे महत्त्वाचे कारण असते आणि त्यामुळे औषधांना प्रतिसाद कमी मिळतो आणि या वयोगटातील रुग्णांच्या जीवनमानावर परिणाम होतो.

- Advertisement -

स्थूलपणा आणि दमा असेल तर दम्याची तीव्रता वाढलेली असते, दमा नियंत्रणात आणणे कठीण जाते आणि दम्याचा आजार बळावण्याची शक्यता वाढते. त्याचप्रमाणे स्थूलपणामुळे दम्याचे निदान करणे कठीण जाते. सामान्य वजन असलेल्या मुलांच्या तुलनेने प्रमाणापेक्षा अधिक वजन असलेल्या किंवा स्थूल मुलांना दमा होण्याची शक्यता अधिक असते.

या मागचे कारण असे आहे की, अतिरिक्त वजनामुळे छाती व पोटाच्या भागातील वाढलेल्या वजनामुळे फुफ्फुसे आवळली जातात आणि श्वास घेणे कठीण जाते. चरबीयुक्त उतीमुळे सूज निर्माण करणारे घटक तयार होतात आणि त्यांचा फुफ्फुसांवर परिणाम होतो आणि अनेक संशोधनांमधून दिसून आले आहे की, याची परिणती दम्यामध्ये होते. स्थूल व्यक्ती अधिक औषधे घेतात, त्यांच्यातील लक्षणे अधिक तीव्र असतात आणि वजन प्रमाणात असलेल्या व्यक्तींच्या तुलनेत आपल्या दम्यावर नियंत्रण मिळविण्यास कमी सक्षम असतात. दमा आणि ३० पेक्षा जास्त बीएमआय असलेल्या व्यक्ती कमी बीएमआय असलेल्या व्यक्तींसारख्या औषधांना प्रतिसाद देत नाहीत.

- Advertisement -

अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी काय करावे?
अतिरिक्त वजनामुळे दमा होण्याची शक्यता वाढते, असलेला आजार बळावतो आणि दम्यावर नियंत्रण मिळविणे कठीण जाते. यासाठी तुमच्या आहारात ताजी फळे व भाज्यांचा समावेश करावा आणि चरबीयुक्त पदार्थांचे सेवन कमी करावे. तुम्ही कोणता आहार घ्यावा यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. त्याचप्रमाणे चरबीयुक्त घटक अधिक असलेला आहार घेतल्यामुळे दमा असलेल्या व्यक्तींच्या श्वसनमार्गाला सूज येते. त्यामुळे हे टाळावे. चरबी कमी करण्यासाठी चालणे, धावणे, पोहणे यासारखे व्यायाम करावेत. त्याचप्रमाणे सेल्फ-मेडिकेट म्हणजे स्वत:हून औषधे घेऊ नये आणि कोणतीही ओव्हर द काऊंटर उत्पादने वापरू नयेत.

-डॉ.समीर गर्दे छाती विकारतज्ज्ञ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -