घरमुंबईबीकॉमची परीक्षा वेळेनुसारच

बीकॉमची परीक्षा वेळेनुसारच

Subscribe

शिक्षणमंत्र्यांच्या नावावर केलेले ट्विट बनावट

मुंबई विद्यापीठाची एफवायबीकॉमची परीक्षा पुढे ढकलल्याचे ट्विटचा एक फोटो शुक्रवार रात्रीपासून सोशल नेटवर्किंग साईटवर आगीसारखे पसरले असून हे ट्विट बनावट असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाची कोणतीही परीक्षा पुढे ढकलली नसून परीक्षा ही ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे मुंबई विद्यापीठाने जाहीर केले आहे. तर याप्रकरणी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी देखील ट्विट करुन त्यांचा ट्विटचा फोटो वापरुन व्हायरल होत असलेला मॅसेज बनावट असून त्यावर विश्वान न ठेवण्याचा आवाहन मुंबईतील विद्यार्थ्यांना केले आहे.

मुंबई विद्यापीठाची एफवायबीकॉमची परीक्षा रद्द करुन ती परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे ट्विटचा शुक्रवार संध्याकाळी सोशल नेटवर्किंग साईटवर आणि विद्यार्थ्यांच्या व्हॉटअ‍ॅपवर पसरले आणि एकच गोंधळ उडाला. या मॅसेजमध्ये तावडेंच्या ट्विटरच्या अकाऊंटच्या फोटोमध्ये विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षाचा पेपर रद्द झाल्याची माहिती तावडेंनी दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. या मॅसेजनंतर मुंबई विद्यापीठाकडून शिक्षणमंत्र्यांचे अकाऊंट हॅक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र यानंतर तावडे यांनी स्वतः ट्विट करत आपलं अकाऊंट हॅक झाले नसून, आपल्या नावाने चुकीची माहिती देणारा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर पसरवला जात असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

दरम्यान, ही निव्वळ अफवा असून विद्यापीठ प्रशासनाच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ दखल घेत तावडेंचे अकाऊंट हॅक करण्यात आले असून परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे रात्री उशीरा जाहीर केले. तर या चुकीचा मॅसेज व्हायरल होत असल्याची माहिती मिळताच तावडेंनी स्वतः ट्विट करून हा मॅसेज चुकीचा असल्याचे स्पष्ट केले.

यासोबतच विद्यार्थांनी कोणत्याच अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन देखील केले. यावेळी तावडेंनी वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थांना परिक्षेकरिता शुभेच्छा देऊन वेळापत्रकानुसार विद्यार्थांनी परिक्षेस हजर रहावे, असे स्पष्ट केल्याने शुक्रवारपासून सुरु झालेले अफवांचे वादळ अखेर शांत झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -