‘क्या आपके नमक में सायनाइड है|’

रोजच्या जेवणात मिळतंय जगातील सर्वात घातक विष, यूएस लॅब अहवालातील निष्कर्ष

Mumbai

जेवणात जर चवीनुसार मीठ नसेल तर जेवण बेचव लागतं. मीठ बनवणाऱ्या कंपन्याही मीठाला आयोडिनयुक्त असल्याचं सांगत लोकांमध्ये भ्रम निर्माण करतात. पण, खूप कमी लोकांना हे माहित आहे की, जेवणातून आपल्या शरीरात जाणारं हे मीठ कॅन्सर सारख्या भयानक आजाराला जन्म देत आहे. नुकतंच अमेरिकेच्या विश्लेषणात्मक लॅब अहवालातून हे स्पष्ट झालं आहे की, भारतातील प्रमुख ब्रँडतर्फे विकल्या जाणाऱ्या प्रक्रिया केलेल्या आयोडाइज्ड मिठामध्ये कार्सिनोजेनिक आणि सायनाइडसारखे अन्य घातक घटक मोठ्या प्रमाणात समाविष्ट केले जात आहेत.

टाटा मीठात १.८५ एमजी/किलो या घातक प्रमाणात सायनाइडचा समावेश असल्याचं चाचण्या केलेल्या अमेरिकेन वेस्ट अॅनालिटिकल लॅबोरेटरीजने जाहीर केले आहे. साम्भर रिफाइन्ड मीठात सायनाइडचे प्रमाण ४.७१ एमजी/किलो आहे. तर, टाटा सॉल्ट लाइटमध्ये ते १.९० एमजी/ किलो आहे असं नमूद केलं आहे.

औद्योगिक कचऱ्याचे पुन्हा पॅकेजिंग करून खाद्य मीठाची विक्री

गोधम ग्रेन्स अँड फार्म प्रॉडक्टचे अध्यक्ष शिव शंकर गुप्ता घातक घटक असणाऱ्या मिठापासून मुक्तता करण्याची मोहीम उघडली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “ खाद्य मीठाच्या उत्पादन उद्योगातील आघाडीच्या कंपन्या आयोडिन आणि सायनाइड अशा घातक रसायनांचा समावेश असणाऱ्या औद्योगिक कचऱ्याचे पुन्हा पॅकेजिंग करत आहेत आणि खाद्य मीठ म्हणून त्याची विक्री करत आहेत. यामुळे लोक कॅन्सर, हायपरथायरॉइडझम, उच्च रक्तदाब, नपुंसकता, स्थूलता आणि किडनी निकामी होणे, अशा आजारांना बळी पडत आहेत,”

मीठ ‘रिफाइन’ करण्यासाठी घातक प्रक्रिया

गुप्ता यांनी पुढे सांगितलं “ हे ब्रँड मीठ ‘रिफाइन’ करण्यासाठी घातक प्रक्रिया अवलंबतात. सर्वांना माहीत असणारे सायनाइड हे विष भारतातील आघाडीच्या मीठ उत्पादक कंपन्या मोठ्या प्रमाणात वापरत आहेत. नैसर्गिक मिठामध्ये तसेही उपलब्ध असणारे आयोडिन कृत्रिमदृष्ट्या समाविष्ट केले जाते. ”

मीठाच्या प्रमाणकांबाबत सरकार उदासीन

ब्रँडेड मिठाच्या उत्पादनात गुणवत्ता प्रमाणके राखल्याची खात्री करण्याची जबाबदारी असणारे सरकारी विभाग उदासीन आहेत. कोणत्याही मोठ्या मीठ उत्पादकाने चाचणी करण्यासाठी अर्ज केलेला नाही किंवा रिफाइन्ड मिठाची निर्मिती कशी करायची, याबाबत संभ्रमात असणाऱ्या एफएसएसएआयकडून परवान्यासाठी अर्ज केलेला नाही, असे माहिती अधिकारांतर्गत समोर आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here