घरलाईफस्टाईलखुणांचे निशाण कायमस्वरूपी नाहीसे करणे शक्य

खुणांचे निशाण कायमस्वरूपी नाहीसे करणे शक्य

Subscribe

खेळताना, मस्ती करताना किंवा कधी कधी अपघातामुळे आपल्या चेहर्‍यावर, शरीरावर झालेल्या जखमा आपल्याला दीर्घकाळ त्रासदायक ठरतात. काळे डाग म्हटले की कुणालाही ते नकोसेच असतात. अगदी स्त्री असो वा पुरुष, काळ्या डागांवर उपचाराबाबत सजग असतात. पण हे काळे डाग येतात कशामुळे? आणि ते न होण्यासाठी काय केलं पाहिजे? असे प्रश्न अनेकांना पडतात. या जखमांच्या खुणांमुळे सौंदर्यतही उणीवा राहतात, मात्र वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे आता हे डाग मिटविणे देखील सोपे झाले असून याकरिता विविध तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

खरेतर चेहर्‍यावरील जखमांच्या खुणा सहजासहजी मिटविता येत नाहीत, मात्र काही उपचार पध्दतींचा वापर करून आता जखमांचे डाग देखील घालविता येणार आहे. यामुळे स्त्री-पुरुषांमध्ये असलेला आत्मविश्वास देखील नक्कीच वाढेल. त्वचेचा रंग, पोत, नितळ कांती, केसांची चमक, लांबी, जाडी असे अनेक निकष सौंदर्याचा विचार करताना महत्त्वाचे ठरतात. यामध्ये कुठेही त्रुटी आली तर सौंदर्याला बाधा येते. त्वचेतील दोष काढून तिला पुन्हा सुंदर बनवण्याच्या शास्त्राला त्वचा सौंदर्यशास्त्र म्हणतात. खालील पध्दतीने जखमेमुळे पडलेल्या डागांवर कायमस्वरुपी उपचार करत पुन्हा नैसर्गिक सौंदर्य प्राप्त करता येणार आहे.

केमिकल पीलिंग 

केमिकल पील या उपचाराला अलीकडे दुसरा चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. त्याला म्हणतात लेसर रिसरफेसिंग. यासाठी कार्बन डायऑक्साइड फ्रेक्शनल लेझर किरण वापरतात आणि त्वचेचा डागाळलेला, खड्डे पडलेला भाग वरचे पेशींचे काही थर नष्ट करून तिथली त्वचा नितळ गुळगुळीत बनवतात. यामुळे चेहर्‍याला नवसंजीवनी मिळते. रिसरफेसिंगची क्रिया काहीशी रस्ते बनवणार्‍या मशीनसारखी असते. चेहर्‍यावर वयपरत्वे उमटणार्‍या रेघा, सुरकुत्या काढून चेहरा अधिक तरुण, टवटवीत बनवणारी ही ट्रिटमेंट वय होण्याची प्रक्रियाच जणू थांबवते.

- Advertisement -

लेझर 

चेहर्‍यावरील किंवा शरीरावरील जुने व्रण किंवा डाग घालविण्यासाठी या उपचार पद्धतीचा वापर करण्यात येतो. हे व्रण शस्त्रक्रियांमुळे, अपघातांमुळे किंवा भाजल्यामुळे आलेले असू शकतात. हे व्रण किती जुने आहेत, त्वचेमध्ये किती खोलपर्यंत गेलेले आहेत, कशामुळे हे व्रण उपन्न झाले आहेत, या सर्व गोष्टींचा विचार करून लेझर उपचारपद्धती प्रत्येक क्लायंटसाठी ‘कस्टमाइझ’ केली जाते. ह्या ट्रिटमेंटद्वारे त्वचेचे टीश्यू दुरुस्त केले जातात, ज्यामुळे त्वचेवरील व्रण हलके होत जाऊन, दिसेनासे होतात.

मायक्रोडर्माब्रेशन

यामध्ये चेहर्‍याच्या वरच्या भागातील त्वचा निघून नवीन त्वचा येते. त्यामुळे काळे डाग नाहीसे होतात.

- Advertisement -

मायक्रो निडलिंग

यामध्ये जे औषध डाग कमी करण्यासाठी किंवा रंग उजळण्यासाठी वापरतात, ते मायक्रो निडलिंगने चेहर्‍याच्या आत सोडले जातात.

फिलर्स 

फिलर्स ही त्वचेची प्रक्रिया आहे. इंजेक्शनच्या सहाय्याने हे फिलर्स केले जातात. या फिलर्सचा इफेक्ट सहा महिने राहतो. फिलर्स करुन घेण्याची प्रक्रिया महागडी आहे. पण तरीही त्वचेबाबत जागरूक असणारी तरुणाई या महागड्या प्रक्रिया करुन घेण्यास पसंती देते. फिलर्स ही सर्जरी नाही. त्यामुळे त्यासाठी फार तयारीची गरज लागत नाही.

बोटॉक्स 

सुरकुत्या घालवण्यासाठी दुसरा उपाय म्हणजे बोटॉक्स. त्वचा केवळ कोलाजेन कमी झाल्यामुळे सैल पडते आणि सुरकुतते असं नाही, तर वारंवार हसणे, डोळे मिचकावणे, आठ्या घालणे, भुवया आक्रसणे अशा विविध भावदर्शक स्नायूंच्या हालचालींनीसुद्धा सुरकुत्या पडतात. हे स्नायू शिथिल करायचं काम बोटॉक्स करतं. क्लोस्ट्रिडियम बोटुलिनम नावाच्या जंतूंपासून मिळणारा हा पदार्थ त्वचेखाली इंजेक्शनच्या रूपात दिल्यावर तिथले स्नायू शिथिल पडतात आणि चेहरा गुळगुळीत दिसायला लागतो.

स्कीन क्रीम 

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमितपणे क्रीम वापरूनही डाग घालविण्यास मदत होते. मात्र या प्रक्रियेला पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे आणि त्या प्रकारे त्वचेची काळजी घेणे जरूरी आहे.यापैकी कोणतीही ट्रिटमेंट घेण्यापूर्वी त्याविषयीची माहिती तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. योग्य प्लास्टिक सर्जनच अचूक उपचारांनी जखमांचे डाग मिटवू शकतो हे लक्षात घेतले पाहिजे. सद्य स्थितीतील मिळणारा प्रतिसाद पादता त्वचा सौंदर्याची उपचार केंद्रंही तशीच वाढत आहेत. कुरूप चेहर्‍यामुळे आत्मविश्वास गमावून बसलेल्यांना असे उपचार म्हणजे वरदानच आहे, अशी प्रतिक्रिया कॉस्मेटीक सर्जन देबराज शोम यांनी व्यक्त केली.

– डॉ. देबराज शोम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -