टॅन को मारो गोली!

Mumbai

बाहेर मनसोक्त भटकताना, उन्हात, पावसात, पाण्यात खेळताना त्वचेकडे आपलं लक्षच जात नाही. परिणामी त्वचा लवकर टॅन होते. तुमचीही स्कीन टॅन झाली असेल तर डोंट वरी. घरगुती काही उपायांनी तुम्ही हे टॅनिंग दूर करु शकता. तुमच्यासाठीच या काही खास टॅनिंग टिप्स.

१) खूप पाणी प्या. काकडीचं, कलिंगडाचं ज्यूस प्या. काकडीच्या स्लाइस डोळ्यांवर ठेवा.
२) गार दुधात कापूस बुडवून डोळ्यांवर ठेवा.
३) टॅन झालेल्या त्वचेच्या भागावर कोरफडीचा रस लावणं केव्हाही चांगलंच.
४) खायच्या डोशाचं पीठ टॅन झालेल्या त्वचेवर लावा. ते सुकेपर्यंत ठेवा आणि मग धुवून टाका. याने टॅनिंग कमी होऊन       त्वचा उजळेल.
५) कच्च्या दुधात बेसन आणि लिंबाचे थेंब टाकून हे मिश्रण त्वचेवर लावा. १५ मिनिटं ठेवून धुवून टाका. सतत ४ आठवडे      असं केल्यास चांगला परिणाम दिसेल.
६) १ चमचा दूध पावडर, १ चमचा मध, १ चमचा लिंबाचा रस आणि अर्धा चमचा बदामाचं तेल एकत्र करा. त्वचेवर लावून     १५ मिनिटं ठेवून धुवून टाका. काळपटपणा जाऊन त्वचा चमकदार होईल. शिवाय मऊपणाही राहील.