Thursday, August 6, 2020
Mumbai
27 C
घर लाईफस्टाईल असा सांभाळा, तुमच्या लग्नाचा महाग लेहेंगा…

असा सांभाळा, तुमच्या लग्नाचा महाग लेहेंगा…

आपल्या लेहेंगाची चमक आपण कशी कायम राखू शकतो, त्याविषयी जाणून घेऊया...

Mumbai

लग्न-सोहळा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असतो. याविषयी कोणीही कोणतीच तडजोड सध्या करताना दिसत नाही. आपल्या लग्नाचे खास क्षण आठवणीत ठेवण्यासाठी नवरी आपल्या ड्रेसअप विषयी अधिक सतर्क असते. कित्येकदा लग्नासाठी खूप महाग असणारा लेहेंगा खरेदी केला जातो. मात्र नंतर त्याचा वापर खूपच कमी होतो. असे असले तरी लग्नाचा लेहेंगा अनेक सण-उत्सवांसाठी किंवा सोहळ्यासाठी देखील वापरला पुन्हा जाऊ शकतो परंतु यासाठी त्याची योग्यप्रकारे काळजी घेणे फार महत्वाचे असते. आपल्या लेहेंगाची चमक आपण कशी कायम राखू शकतो, त्याविषयी जाणून घेऊया…

लेहेंगा नेहमी ड्राई क्लीन करावा

लग्नाचा लेहेंगा वेळोवेळी ड्राई क्लीन केला पाहिजे. यामुळे लेहेंगावरील धूळ साफ होईल. तुमच्या लेहेंग्यावरील लेबल काळजीपूर्वक वाचा. त्यावर दिलेल्या सूचना ड्राय क्लीनरला सांगितल्याने तुमचा लेहेंगा खराब होणार नाही.
काही वेळेला ड्राय क्लीन करताना वापरण्यात येणारे केमिकलमुळे तुमचा लेहेंगा खराब होऊ शकतो.

एम्ब्रॉयडरी वर्क नीट ठेवा

बऱ्याचदा उठल्या बसल्याने महागडा असणाऱ्या लेहेंग्याचे एम्ब्रॉयडरी वर्क खराब होऊ शकते. त्यामुळे हा लेहेंगा पॅक करून ठेवताना त्याचे एम्ब्रॉयडरी वर्क नीट करून घ्यावे. जर लेहेंगा नीट ठेवला तर तो नंतर कोणत्याही कार्यक्रमास सहज वापरता येईल.

लेहेंगा काळजीपूर्वक फोल्ड करावा

लेहेंगा घडी घालून ठेवताना लक्ष देणे आवश्यक आहे कारण निष्काळजीपणा लेहेंगाचे वर्क खराब करू शकतो. लेहेंगा फोल्ड करताना त्यामध्ये बटर पेपर टाकून फोल्ड करू शकतात . त्यामुळे लेहेंगाचे वर्क खराब होत नाही.

हवेशीर जागी लेहेंगा ठेवा

तुमचा लेहेंगा थोडा हवेशीर ठिकाणी ठेवा कारण ओलावा किंवा दमटपणा मुळे बुरशी लागू शकते. त्यामुळे महाग लेहेंगा खराब होऊ शकतो.


अशी राखा केसांची निगा