घरलाईफस्टाईलमेथी मटर मलाई

मेथी मटर मलाई

Subscribe

बऱ्याचदा मेथीची भाजी म्हटलं की अनेक जण नाक मुरडतात. मात्र, हीच मेथीची भाजी जरा वेगळ्या पद्धतीने केल्यास लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळेच बोट चाखत बसतील. चला तर जाणून घेऊया मेथी मटर मलाईची झटपट रेसिपी.

साहित्य

- Advertisement -
  • २०० ग्रॅम निवडलेली मेथी
  • १५० ग्रॅम मटार (वाफवलेले)
  • १ मोठा कांदा बारीक चिरलेला
  • १ चमचा आलं, लसूण पेस्ट
  • अर्धा कप फेटलेलं दही
  • टोमॅटो प्युरी
  • १ चमचा तेल
  • मीठ
  • दीड चमचा तिखट
  • १ चमचा जिरेपूड
  • १ चमचा धणेपूड
  • १ चमचा गरम मसाला
  • अर्धा कप क्रीम
  • २ चमचे लोणी

कृती

तेल गरम करून कांदा गुलाबी करा. आलं, लसूण पेस्ट, मेथी चिरून घाला आणि परतवून घ्या. त्यानंतर तिखट, धणेपूड, जिरेपूड, मीठ, टोमॅटो प्युरी, वाफवलेला मटार घालून परता. क्रीम घालून परता. वर लोणी घालून गॅस बंद करा. ही भाजी मेथीमुळे हिरवी दिसते आणि चव देखील छान लागते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -